बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ दोन तारखांना होणारी परीक्षा लांबणीवर

मुंबई | दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनंच होणार हे आता निश्चित झालं आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतचं परीक्षा (HSC Board Exam TimeTable) देता येणार आहे. मुख्याध्यापक, विषयतज्ज्ञ यांच्याशी चर्चा करून सरकारने हा निर्णय घेतला होता.

न्यायालयाने देखील सरकारच्या या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं आहे. अशातच आता बारावीच्या विद्यार्थ्यासाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वी बारावी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं होतं. त्या वेळापत्रकामध्ये आता अंशतः बदल करण्यात आला आहे. बारावीचे 5 आणि 7 मार्चला होणारे पेपर आता 5 आणि 7 एप्रिलला घेण्यात येणार आहे.

5 मार्च रोजी होणारा हिंदीचा पेपर आता 5 एप्रिलला होणार असल्याची माहिती समोर आलीये. तर सात मार्चला होणारा मराठीचा पेपर हा सात एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे.

काही प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्याने आता हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. 5 मार्चला सकाळी हिंदी तर दुपारच्या सत्रात जर्मन, जपानी, चिनी आणि पर्शियन विषयाचे पेपर होणार होते. ते आता 5 एप्रिलला होतील.

तर दुसरीकडे 7 मार्चला होणारे भाषा पेपर हे 7 एप्रिलला होतील. बारावीच्या परीक्षा 4 मार्च ते 30 मार्च या कालावधीत घेण्यात येतील.

दरम्यान, प्रात्याक्षिक परीक्षा, श्रेणी परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्चमध्ये होणार आहेत. त्यामुळे आता विद्यार्थी पुर्णपणे तयारी करण्यात व्यस्त आहेत.

महत्वाच्या बातम्या- 

“संजय राऊतांची मानसिक स्थिती खराब झालीये हीच आत्ताची ब्रेकिंग न्यूज”

Russia-Ukraine War: युक्रेनसोबत रशियाचं नेमकं भांडण काय?, वाचा सविस्तर

पावनखिंड चित्रपट पाहणाऱ्यांना ‘या’ ठिकाणी मिळणार मिसळवर बंपर डिस्काऊंट

रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला मोठा फटका; ‘या’ गोष्टी महागणार 

Russia-Ukraine War : रशिया-युक्रेन युद्ध; जगासाठी पुढील 48 तास महत्त्वाचे