रशिया-युक्रेन युद्धाचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल, रशियन लष्कराच्या हालचालींना वेग; पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं पहायला मिळत असून त्यातच आता रशियाच्या राष्ट्रपतींनी युक्रेन विरूद्ध युध्दाची घोषणा केली आहे.

रशियाची सेना युक्रेनमध्ये सिक्रेट ऑपरेशन करणार असून युक्रेनच्या सैनिकांनी आम्हाला शरण यावं असा इशारा पुतीन यांनी दिला आहे. त्यामुळे युक्रेननं आपलं एअरस्पेस बंद केलं आहे.

पुतीनच्या घोषणेनंतर युक्रेनने सर्व तयारी केली आहे. आम्ही युध्दासाठी तयार आहोत, असं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की म्हटल्याने आता जगाचं टेन्शन वाढलंय.

अशातच युक्रेनच्या शस्त्राने भरलेल्या गोदामाचा ब्लास्ट झाला आहे. याचा व्हिडिओ सध्या खुप व्हायरल होत आहे. त्यामुळे जगभरात त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

रशियाने केलेल्या हल्यामुळे युक्रेनमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यांना भीती आहे की, त्यांच्या देशात येणाऱ्या विमानांवर सायबर अटैक किंवा गोळीबार होऊ शकतो, त्यामुळे धोका लक्षात घेता युक्रेनने आपले एयरस्पेस लोकांसाठी बंद केलं आहे.

युक्रेन स्टेट एअर ट्रॅफिक सर्व्हिस एजन्सीनं दिलेल्या माहितीनुसार इस्रायलमधून आलेली विमाने युक्रेनच्या हवाई क्षेत्रातून माघारी गोली, त्यामुळे उड्डाणांबाबत सावधानगी बाळगली जात आहे.

युरोपने या आधीच रशिया आणि बेलारूच्या सीमेवरील तनाव पाहून नागरी विमान वाहतुकीला धोक्याचा इशारा दिला होतो. त्यामुळे उड्डाणाबद्दल नागरिकांना गैरसमज होईल, असं युरोपने म्हटलं आहे.

विमान वाहतुक बंद असल्यामुळे युक्रेनमधील इंधन दरात 100 डॉलरने कमी झाले. त्यामध्ये आता युक्रेन मध्ये हालचालींना वेग मिळालेला आहे. त्यातच आता रशियाच्या राष्ट्रध्यक्षांचे वक्तव्य समोर आले आहे

दरम्यान, आम्हाला जर कोणत्या देशाने आडवण्यचा प्रयत्न केला तर त्याचे परीणाम खुप वाईट होतील असा थेट इशारा रशियाच्या राष्ट्रध्यक्षांनी दिलाय.

पाहा व्हिडीओ-


महत्वाच्या बातम्या- 

“संजय राऊतांची मानसिक स्थिती खराब झालीये हीच आत्ताची ब्रेकिंग न्यूज”

Russia-Ukraine War: युक्रेनसोबत रशियाचं नेमकं भांडण काय?, वाचा सविस्तर

पावनखिंड चित्रपट पाहणाऱ्यांना ‘या’ ठिकाणी मिळणार मिसळवर बंपर डिस्काऊंट

रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला मोठा फटका; ‘या’ गोष्टी महागणार