‘ऑल द बेस्ट’; बारावीची परीक्षा आजपासून सुरु!

पुणे| महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची परीक्षा मंगळवार (18 फेब्रुवारी) सुरू होत आहे. परीक्षेसाठी 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 13 हजारांनी वाढली आहे. विद्यार्थ्यांना वेळेआधी अर्धा तास परीक्षा कक्षात पोहोचणे आवश्यक असून, अकरा वाजेपर्यंतच कक्षात प्रवेश दिला जाणार आहे.

18 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ मंडळांमार्फत परीक्षा होईल. परीक्षेसाठी राज्यभरात यंत्रणा सज्ज झाली आहे.

परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी मंडळातर्फे विभागीय मंडळांच्या माध्यमातून भरारी पथके नेमण्यात आली आहेत. परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षकांसह अन्य कर्मचाऱ्यांना मोबाइल वापरण्यास बंदी असून केंद्रसंचालकांकडे मोबाइल जमा करायचे आहेत.

विद्यार्थ्यांना अकरा वाजेपर्यंतच परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार असून अकरा वाजल्यानंतर येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उशिरा येण्याच्या कारणाची केंद्रप्रमुख पडताळणी करून प्रवेश देण्याबाबतचा निर्णय घेतील.विद्यार्थ्यांना परीक्षा साहित्याशिवाय स्मार्टफोन, स्मार्टवॉच अशा अन्य कोणत्याही वस्तू परीक्षा कक्षात नेता येणार नाहीत, असे डॉ. काळे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या-

-एल्गार परिषदेच्या तपासासंदर्भात शरद पवार म्हणतात…

-कडक सॅल्यूट… भीषण अग्नीतांडवात स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यानं तिरंगा वाचवला!

-“महाराज कीर्तनातून नेहमी चांगले उपदेश देतात, त्यांच्याबद्दल सरकारची भूमिका वाईट नाही”

-इंदुरीकर महाराजांच्या बोलण्यात काही आक्षेपार्ह आहे असं मला वाटतं नाही- रूपाली पाटील

-महाराज फक्त आवाज द्या…. ताकदीनिशी रस्त्यावर उतरतो- महेश लांडगे