राज्यात 15 जूनपासून शाळा सुरू करण्याचा विचार; शिक्षणमंत्र्यांचे संकेत

मुंबई |  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा कधी सुरू होणार? असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडला आहे. कोरोनाचा लहान मुलांना जास्त धोका आहे त्यामुळे शाळा सुरू करू नयेत अशी मतं काही लोक व्यक्त करत मात्र शासनाने शाळा सुरू करण्याबाबत सकारात्मक पावलं उचलली आहेत.

महाराष्ट्रात करोनाच्या संकटात शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत. अशात आता 15 जून पासून शाळा सुरु करण्याचा विचार सरकार करत आहे असे संकेत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.

सध्या देशात लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरु आहे. अशात मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर आणि 15 इतर प्रमुख शहरं ही रेड झोन मध्ये आहेत. मात्र हळूहळू शाळा सुरु करण्याचा विचार राज्य सरकार करतं आहे असं वर्षा गायकवाड यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

महाराष्ट्रात शाळा सुरु झाल्यानंतर आठवड्यातले 48 तास त्या सुरु ठेवल्या जातील. म्हणजे शनिवार-रविवार अशी सुट्टी देणाऱ्या शाळांना ती मुभा नसेल असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-लॉकडाऊनमध्ये मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले 19 हजार 100 कोटी रूपये…!

-कोणत्याही परिस्थितीत कंटेनमेंट झोनमध्ये कडक बंधने पाळली गेली पाहिजेत; अजितदादांच्या प्रशासनाला सूचना

-निलेश राणेंच्या धमकीला मी घाबरत नाही- रोहित पवार

-महाराष्ट्रातला मृत्यूदर गुजरात मध्य प्रदेशपेक्षा कमी, मात्र संसर्गाचा दर अधिक…

-आजारी वडिलांना घेऊन 7 दिवसांत 1200 किमी सायकल प्रवास; ज्योती कुमारचं इवांका ट्रम्पकडून कौतुक