काँग्रेसला मोठा झटका; ‘या’ आमदाराचा तडकाफडकी राजीनामा

पणजी | जसं जसं गोवा विधानसभा निवडणूक जवळ येऊ लागली तसं तसं राज्यातील राजकारणानं वेग घेतलाय. सत्तेसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. मात्र निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला गोव्यात मोठा धक्का बसला आहे.

लॉरेन्स यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसचे गोवा विधानसभेतील संख्याबळ दोनवर आले आहे. लॉरेन्स हे दक्षिण गोव्यातील कुर्टोरीम मतदारसंघाचे आमदार आहेत.

आज विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवला. त्यांनी काँग्रेसचाही राजीनामा दिला आहे, अशी माहिती आहे. ते कुठल्या पक्षात जाणार याबद्दल अद्याप काहीही सांगण्यात आलेलं नाही.

गोव्यामध्ये फेब्रुवारी-मार्च महिन्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. काँग्रेसकडून नुकत्याच जाहीर झालेल्या यादीनुसार, कामत हे मडगाव मतदारसंघातील लढतील. कामत हे गोवा काँग्रेसचे अध्यक्ष तसेच विरोधी पक्षनेतेही आहेत.

काँग्रेसचे उपाध्यक्ष असलेल्या संकल्प आमोणकर (Sankalp Amonkar) यांचाही या यादीत समावेश असून त्यांना मुरगाव मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं आहे. कुर्टोरीम मतदारसंघात अलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांची उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये आलेले सुधीर कानोलकर यांना म्हापसा मतदारसंघातून तिकीट मिळालं आहे. कानोलकर हे भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य होते.

ताळेगाव मतदारसंघातून टोनी रॉड्रिगेज हे लढतील. तर फोंडामधून पक्षाने राजेश वेर्णेकर यांना तिकीट दिलं आहे. कुंकळ्ळी मतदारसंघात युरी आलेमाव आणि केपे मतदारसंघातून अँटोनी डीकोस्टा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे. गोवा पुन्हा काबीज करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली असून सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्याकडे पक्षाने निवडणुकीची धुरा दिली आहे. प्रियांका यांनी नुकताच गोव्याचा दौरा केला होता.

गोव्यात सध्या भाजपची सत्ता आहे. प्रमोद सावंत हे मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळत आहे. स्वच्छ प्रतिमेचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. मनोहर पर्रिकर यांच्या पश्चात सावंत यांनी यशस्वीपणे नेतृत्व सांभाळलं आहे. असं असलं तरी गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहता भाजपसाठी आगामी विधानसभा निवडणूक जितकी वाटते तितकी सोपी नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

काँग्रेसची मोठी खेळी; ‘त्या’ 12 आमदारांना काँग्रेसचा दे धक्का? 

‘लस घेतलेल्या 90 टक्के भारतीयांना….’; संशोधनातून धक्कादायक माहिती समोर 

पॉर्नोग्राफी निर्मितीबाबत राज कुंद्राचा मोठा खुलासा, म्हणाला…

“2019 च्या निवडणुकीत जनतेनं तुम्हाला औकात दाखवून दिली” 

“राणे ज्या पक्षात जातात त्यांची सत्ता जाते, तरी फडणवीसांना सांगितलं होतं यांना पक्षात घेऊ नका”