माझे 30-35 आमदार होऊ द्या, 10 मिनिटांत…- महादेव जानकर

परभणी |  सामान्य लोकांना न्याय देण्याची भूमिका आम्ही घेतो, माझे 30-35 आमदार होऊ द्या. ओबीसींची 10 मिनिटांत गंमत करून दाखवतो, असं वक्तव्य राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केलं आहे.

गंगाखेडमध्ये ओबीसी संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनास महादेव जानकर यांनी सोमवारी भेट दिली. त्यावेळी महादेव जानकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

मुस्लिमांनवर तर किती अन्याय आहे, गॅरेज बघितलं की मुसलमान, अंड्याचं दुकान म्हणलं की मुसलमान, कोंबडीचे दुकान बघितलं की मुसलमान, त्यांचा कुठं कलेक्टर नाही, असं महादेव जानकर यांनी सांगितलं.

हिंदू भी भिकारी अन मुसलमान भी भिकारी आणि राज्य चालवणारा हा तिसराच मालक असतो. हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवं, असं महादेव जानकरांनी म्हटलं आहे.

मराठा समाजाला मी विनंती करतो, छत्रपती शाहू महाराजांनी देशात पहिलं आरक्षण दिलं, ते मराठ्यांचे होतं. मराठ्यांना पहिलं आरक्षण नव्हते. त्यानंतर मराठ्यांचे आरक्षण का गेलं, असा सवाल महादेव जानकर यांनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे आता ओबीसींसाठीच्या जागांवरील आरक्षण उठवून त्या जागांवर निवडणुका घेण्यात येणार आहेत.

दरम्यान, बाजूला ग्रामपंचायत, नगरपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना, ओबीसींच्या जागांवरील निवडणुकांना स्थगिती देण्यात आली. त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

काँग्रेसची मोठी खेळी; ‘त्या’ 12 आमदारांना काँग्रेसचा दे धक्का? 

‘लस घेतलेल्या 90 टक्के भारतीयांना….’; संशोधनातून धक्कादायक माहिती समोर 

पॉर्नोग्राफी निर्मितीबाबत राज कुंद्राचा मोठा खुलासा, म्हणाला…

“2019 च्या निवडणुकीत जनतेनं तुम्हाला औकात दाखवून दिली” 

“राणे ज्या पक्षात जातात त्यांची सत्ता जाते, तरी फडणवीसांना सांगितलं होतं यांना पक्षात घेऊ नका