सोशल मीडियावरील एका व्हिडीओचा चमत्कार; रडणारा बाबा हसू लागला!

नवी दिल्ली | समाजात नेहमी अशा काही घटना घडत असतात, ज्यामुळे माणुसकी आहे की नाही, हा प्रश्न पडतो. पण दिल्लीत नुकतीच एक अशी घटना घडली आहे की, तुमचा माणुसकीवरील विश्वास अजून दृढ होईल.

दिल्लीतील एका ८० वर्षीय व्यक्तीची नुकतीच एक व्हिडिओ समोर आली. त्यात ते रडताना दिसत आहे. हे आजोबा मालवीय नगर भागामध्ये हनुमान मंदिरापुढे ढाबा चालवत आहे. त्यांच्या ढाब्याच नाव ‘बाबा का ढाबा’ आहे.

सध्या देशात कोरोनाचे संकट आहे. यामुळे अनेक व्यवसायांना याचा फटका बसला आहे. याचा फटका हॉटेल क्षेत्राला जास्त प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे लोक बाहेरच खाण टाळत आहे.

लोक सर्व नियम पाळून त्यांचे पालन करत आहे. त्यातच या आजोबांच्या ढाब्यात सध्या कोणीही येत नाही. त्यामुळे ते अतिशय चिंतेत आपल्या ढाब्यात बसले होते. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती पनीरच्या भाजीचे कौतुक करत आहे.

तो व्यक्ती म्हणत आहे की, ही पनीरची भाजी मोठ-मोठ्या रेस्टॉरंटपेक्षाही चांगली आहे. आजोबा या वयातही ढाबा चालवत आहे. पण सध्या ग्राहक न आल्यामुळे ते नाराज झाले आहे. यातच त्यांना रडू आलं.

त्यांच्या डोळ्यात हळूहळू अश्रू येतात. त्यातच मागे एक आजीही निराश बसलेल्या दिसत आहे. हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचल्यावर त्यांनी आजोबांना मदतीचा हात दिलेला आहे. काही लोक त्यांच्याकडे बँकेचा खाते क्रमांक मागत आहे तर काही लोक तिथे येण्याचे आश्वासन देत आहे.

भारतीय क्रिकेटर अश्विन यांनी ट्विट करून सांगितलंय की मी त्यांना मेसेज करू शकत नाही, मग मी त्यांना कशी मदत करू ? मी त्यांना काही मदत करू इच्छितो. त्यातच अभिनेत्री सोनम आहुजा मदतीसाठी पुढे आल्या आहे.

एका व्यक्तीने ट्विट करून म्हटलय की,”माझ्या दिल्लीतील मित्रांनो, जर तुम्हाला बाहेर कधी जेवण करायचे असेल तर एकदा आजोबांच्या ढाब्यावर नक्की जाऊन या, त्यांचा ढाबा छोटा आहे पण हृदय खूप मोठे आहे.” आजोबांच्या मदतीसाठी असे खूप सारे संदेश आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

बेअरस्टोचं शतक हुकलं, मात्र केलाय असा पराक्रम ज्यात डेविड वॉर्नरही सहभागी!

निकोलस पूरनने यंदाच्या आयपीएलमध्ये केलाय असा पराक्रम, जो कुणालाही जमला नाही!

इलेक्ट्रिक कारमध्ये टाटांची बाजी; नेक्सॉननं रचला ‘हा’ सर्वात मोठा कारनामा!

लग्नाला 58 वर्षे झाल्यानंतर केले लग्नाचे फोटोशूट, कारण वाचून तुमच्या चेहऱ्यावर येईल हसू!

आर्थिक तंगीत 9 लाखाच्या हिऱ्यांची बॅग सापडली, कामगारानं जे केलं ते वाचून हैराण व्हाल!