चक्रीवादळाचा पुन्हा धोका; ‘या’ तीन राज्यांना अलर्ट जारी

नवी दिल्ली | हवामानात सध्या अनेक बदल दिसत आहे. बदलत्या हवामानामुळे नागरिकही हैराण झाले आहेत.

रखरखता उन्हाळा त्यातच अवकाळी पावसाचं थैमान अशातच आणखी एक संकट आल्याचं समोर आलं आहे.

आता चक्रीवादळाची भीती हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांवरही भीतीचं सावट घोंगावत आहे.

बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात तयार झालेले असानी चक्रीवादळाचं रुपांतर तीव्र चक्रीवादळात झालं आहे.

बुधवारी  चक्रीवादळाचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याची आणि गुरुवारपर्यंत खोल दाबामध्ये बदल होण्याची शक्यता आहे, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

असनीमुळे पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि ओडिशा या तीन राज्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिन्ही राज्यांना अलर्ट जारी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “मी मुंबईचा मराठी माणूस आहे, हे शहर आमच्या बापाचं”

  संजय राऊत यांच्यासोबत अभिनेत्रीची गळाभेट, पाहा व्हायरल व्हिडीओ

  दहावी-बारावीच्या निकालाविषयी महत्त्वाची अपडेट समोर!

  सर्वात मोठी बातमी ! मुंबईत 29 ठिकाणी NIAची छापेमारी

  मोठी बातमी ! राणा दाम्पत्यांविषयी महत्त्वाची माहिती आली समोर