“मी मुंबईचा मराठी माणूस आहे, हे शहर आमच्या बापाचं”

मुंबई | राज्यातील राजकीय वर्तुळात सध्या विविध मुद्द्यांनी वातावरण तापलं आहे. यातच शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यातील वाद नेहमीच पहायला मिळतात.

मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर हल्लाबोल केलेला पहायला मिळाला.

मी मुंबईचा मराठी माणूस आहे. हे शहर आमच्या बापाचं आहे, तुमच्यासारख्यांचं नाही. तुम्ही मुंबईला लुटत आहात, असा खोचक टोला संजय राऊत यांनी सोमय्यांना लगावला आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांकडून धाडी टाकण्यात आलेल्या कंपन्यांकडून सोमय्या कुटुंबाच्या खासगी ट्रस्टला कोट्यवधी रुपये देण्यात आले. काळा पैसा पांढरा करण्याचा हा प्रकार आहे का?, असा प्रश्नही संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.

किरीट सोमय्या हे भ्रष्टाचार प्रकरणाचे मुख्य सूत्रधार आहेत. त्यासोबतच आम्ही लवकरच विधानपरिषदेतील भाजपच्या आणखी दोन आमदारांचा भ्रष्टाचार बाहेर काढू,, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

संजय राऊत अजून कोणाचा भ्रष्टाचार बाहेर काढणार आणि कोणकोणाची नावं समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या  – 

  संजय राऊत यांच्यासोबत अभिनेत्रीची गळाभेट, पाहा व्हायरल व्हिडीओ

  दहावी-बारावीच्या निकालाविषयी महत्त्वाची अपडेट समोर!

  सर्वात मोठी बातमी ! मुंबईत 29 ठिकाणी NIAची छापेमारी

  मोठी बातमी ! राणा दाम्पत्यांविषयी महत्त्वाची माहिती आली समोर 

  Gold Rate: सोन्याच्या दरात मोठी वाढ, वाचा ताजे दर