लग्नाला नकार दिल्याने मुलाने मुलीचं घरच पेटवलं; आगीत होरपळून चौघांचा दुर्दैवी मृत्यू

हैदराबाद |  मुलीने लग्नासाठी नकार दिला म्हणून मुलाने थेट तिच्या घरालाच आग लावली. या घटनेमध्ये चौघांचा दुर्दैवी अंत झाला तर दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती कळतीये.

आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील कडियाम मंडळ या गावात मानवतेला काळीमा फासणारी ही घटना घडलीये. 19 वर्षीय श्रीनूचं गावातील नागमणी नावाच्या मुलीवर प्रेम होतं. परंतू तिने लग्नाला नकार दिल्यानंतर त्याचा राग मनात धरून त्याने थेट तिच्या घरालाच आग लावली.

मध्यरात्रीच्या सुमारास मुलाने पेट्रोल पंपावरून पेट्रोल घेतले. यानंतर तो मुलीच्या घराबाहेर पोहचला. तिच्या घराला त्याने बाहेरून कडी लावली. अन् घरावर पेट्रोल ओतून घराला काडी लावली. नागमणीच्या कुटुंबियांच्या घराला आग लागली आहे, हे लक्षात येताच त्यांनी बाहेर येण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा तो प्रयत्न असफल झाला.

श्रीनूने नागमणीच्या घरच्यांना लग्नासाठी विचारणा केली होती. त्यांनीही त्यांच्या लग्नाला परवानगी दिली होती. परंतू श्रीनूच्या वागण्याला नागमणी कंटाळली होती. तिने त्याला लग्नासाठी स्पष्ट नकार दिला. मग तिच्या घरच्यांनी तिचं लग्न दुसऱ्या एका मुलाशी लावून दिलं. गेली एक वर्षभर नागमणी तिच्या सासरी राहत होती.

महत्त्वाच्या बातम्या-