कारला लागतेय अचानक आग; या कंपनीनं आपल्या 4 लाख 71 हजार गाड्या परत मागवल्या!

नवी दिल्ली | गेलेल्या काही महिन्यांपासून कोरोना व्हायरसमुळे अनेक कामं ठप्प झाली होती.  पण अलीकडच्या काळात बाजारात एसयूव्ही गाड्यांची मागणी प्रचंड वाढली आहे.  यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक एसयूव्ही कार देखील बाजारात आल्या आहेत. वाहन कंपन्या देखील पुन्हा एकदा फायद्यात येऊ लागल्या आहेत.

गेल्याच महिन्यांत भारतीय वाहन कंपन्यांच्या विक्रीत सरासरी 10 टक्क्यांची वाढ नोंदविली गेली आहे. अनेक कंपन्या आता आपल्या नवनवीन कार्स बाजारात उतरवू लागल्या आहेत.  गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात लाॅच झालेली ह्यूंनदाई Tucson एसयुव्ही या वर्षीच्या सुरुवातीलाच चर्चेत आहे. ह्युंदाई कंपनी नेहमीच हटके गाड्या बाजारात आणत असते.

ह्युंदाई आपल्या ग्राहकांची आवड लक्षात घेत गाड्यांच्या डिझाईन बनवत असते. आता मिळालेल्या माहितीनुसार कोरिया कार उत्पादक कंपनीने एक नवा निर्णय घेतला आहे.  अमेरिकेत 4,71,000 Tucson एसयुव्ही परत घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर शाॅटसर्कीट होऊ नये, म्हणून कंपनीने वाहन मालकांना देखील यासंदर्भात आवाहन केलं आहे‌.

आग लागून कोणतेही नुकसान होणार नाही.  त्यासाठी आपली कार घराबाहेर मोकळ्या जागेत पार्क करावी.  आता परत मागविण्यात येणारे काही माॅडेल Tucson एसयुव्ही आहेत. या कारमध्ये अँटिलोक ब्रेक सिस्टम आहे. जी कॅम्पुटरला जोडली गेली आहे. ज्यामुळे आगीमुळे होणारं शॉर्ट सर्किट ही होणार नाही

ह्युंदाईने शुक्रवारी घोषणा केली की, रिकॉल समस्येचा सातत्याने तपास केला जात आहे.  याशिवाय शॉर्ट सर्किटमुळे अशा डझनभर गाड्यांना आग लागल्याची माहिती मिळाली आहे, असं कंपनीने म्हटले आहे.  पण चांगली गोष्ट म्हणजे या सर्व वाहनांमधून कोणालाही दुखापत झालेली नाही.

एसयूव्हीच्या मालकांनी त्यांची कार फेब्रुवारीच्या अखेरीस डीलरकडे दाखल करावी, येथील डीलर्स कॅम्पूटरवर फ्यूजची जागा सेट करतील.  कंपनीने असेही म्हटले आहे की, गाडीच्या काही भागांवर गंज चढलेला असतो. गाडी खराब झाल्यामुळे अँटी-लॉक ब्रेकमुळे शॉर्ट सर्किट होऊ शकते.  इंजिन गरम होऊन थांबत नाही त्यामुळे कारला आग लागते.

या कारचा तांत्रिक बिघाड झाल्याने ही वाहने अमेरिकेत परत मागवली जात आहेत.  जर या कारमध्ये आपली कार देखील समाविष्ट असेल तर आपण आपल्या जवळच्या डीलरशिपशी संपर्क साधू शकता. या कारची तपासणीला सुमारे 1 तास लागू शकेल.  कारमध्ये कोणतीही कमतरता आढळल्यास कंपनी निश्चित त्यावर काम करेल. यासाठी ग्राहकांकडून कोणतीही रक्कम घेतली जाणार नाही, असंही कंपनीनं स्पष्ट केलंय.

महत्त्वाची बातम्या-