Hyundai देणार टाटाला टक्कर! ‘या’ विशेष स्वरूपात कार बाजारात येणार

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून संपुर्ण भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. पेट्रोल आणि डिझेला पर्याय म्हणून सीएनजी कार वापरण्याकडे लोकांचा कल वाढलेला आहे. सीएनजी आणि इलेक्ट्रीक कारकडे भारतीय लोकदेखील आता वळू लागले आहेत.

सीएनजीमधील नामांकित कंपनी मारूतीने देखील इतर कार सीएनजीमध्ये आणण्याची तयारी केल्याची माहिती आहे. त्यातच आता ह्युंदाईन देखील आपल्या कार सीएनजीमध्ये आणण्याच्या तयारीत आहे. ह्युंदाई कंपनी आगामी काळात ग्राहकांसमोर नविन सीएनजीचा पर्याय देणार आहे.

अन्य कंपन्यांच्या तुलनेत देशातील दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या ह्युंदाई कंपनीच्या फक्त तीनच कार सीएनजीमध्ये आहेत. याकारणामुळे कंपनी आता सर्वाधिक खपाच्या यादीत असणारी ह्युंदाई व्हेन्यू सीएनजी मध्ये येत आहे.

मारूती सुझूकी कंपनीच्या मारूती स्विफ्ट सीएनजी, मारूती ब्रेझा सीएनजी या कार देखील सीएनजीमध्ये येणार आहेत. तसेच टाटा कंपनीच्या टाटा टीएगो सीएनजी, नेक्सॉन सीएनजी या कारही सीएनजीमध्ये आणणार आहे.

सद्यस्थितीत मारूती सुझूकी क्रमांक एकवर आहे. तर टाटा कंपनी वेगाने वर येत आहे. यामुळे ह्युंदाई कंपनी आता सर्वाधिक खप होणारी सब कॉम्पॅक्ट एसयुव्ही सीएनजीमध्ये आणणार आहे.

ह्युंदाई कंपनी प्रत्येक महिन्याला 4000 हजारांपेक्षा अधिक कार सीएनजीमध्ये विकते. त्यातच बेस्ट सेलिंग असणारी सब कॉम्पॅक्ट एसयुव्ही सीएनजीमध्ये येणार असल्याने कंपनीच्या सीएनजी कार विक्रीत निश्चितच वाढ होणार आहे.

तसेच ह्युंदाई कंपनीकडे ह्युंदाई ग्रॅन्ड आयटेन नियोस, सॅंन्ट्रो आणि ऑरा या सीएनजी कार आहेत. या  सीएनजी कार्सना मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे देशातील बड्या कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे.

कंपनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कार कमी किंमतीत लाँच करण्याची शक्यता आहे. या अगोदर कारचा खप वाढवण्याकरिता ह्युंदाई कंपनीने ग्राहकांना मोठी सुट देखील दिली होती.

ह्युंदाई कंपनी देशांतर्गत दोन नंबरची कंपनी आहे. विशेष बाब म्हणजे मारूती सुझूकी क्रमांक एक वर असून देखील ह्युंदाई कंपनी निर्यातीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.

दरम्यान, ह्युंदाईने एकूण 1,44,982 इतक्या वाहनांची निर्यात केली आहे. ही निर्यात 2020 च्या तुलनेत 15.17 टक्के अधिक आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने होणार का?; सौरव गांगुली म्हणतो…

‘दंगलीचा कट भाजपच्या ‘या’ नेत्याने रचला’; नवाब मलिकांचा गंभीर आरोप

राज्यात मुसळधार पावसाचं सावट! ‘या’ 13 जिल्ह्यांना अलर्ट जारी

‘बाबासाहेब मला नेहमी म्हणायचे…’; राज ठाकरे यांची भावूक पोस्ट

 “धमकी देऊन न्याय मिळत नाही, न्यायालयात आपली बाजू मांडा”