अशोक चव्हाण आणि नितीन गडकरींची दिल्लीत भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

नवी दिल्ली | राज्याच्या राजकारणातील दोन दिग्गज नेत्यांची भेट झाली की विविध चर्चांना उधाण येतं. अशातच राज्याचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि केंद्रीय मंत्री भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी यांची आज दिल्लीत भेट झाली.

काही दिवसांपूर्वी राज्यातील देगलूर विधानसभेत अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीनं भाजपचा दारूण पराभव केला होता. परिणामी या दोन्ही नेत्यांच्या भेटीकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं.

नांदेड जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात अशोक चव्हाण यांच्या प्रतिष्ठेची लढत झाली होती. यावेळी भाजपनंही ही निवडणूक जोर लावून लढवली होती. तरीही भाजपचा पराभव झाल्यानं नांदेडच्या राजकारणात अशोक चव्हाण हेच नाव चालणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

अशोक चव्हाण सध्या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. तर नितीन गडकरी हे केंद्रीय रस्ते विकास मंत्री आहेत. परिणामी राज्याच्या विकासाच्या दृष्टीनं ही भेट महत्त्वाची होती.

सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर असलेले अशोक चव्हाण हे अनेक नेत्यांच्या भेटी घेत आहेत.  केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली.

अशोक चव्हाण आणि गडकरी यांच्यात नांदेड शहरातील विकासकामांवर चर्चा झाली. तसेच राज्यातील रखडलेल्या प्रकल्पावर देखील या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. या बैठकीनंतर अशोक चव्हाण यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.

मराठवाड्याच्या विकासाबाबत नितीन गडकरी यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं अशोक चव्हाण म्हणाले आहेत. परिणामी मराठवाड्यातील रखडलेल्या विकास कामांना गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नितीन गडकरी हे सध्याच्या केंद्रातील कार्यक्षम मंत्री म्हणून सर्वांन परिचयाचे आहेत. महाविकास आघाडीच्या प्रत्येक नेत्याचे त्यांच्याशी समन्वयाचे संबंध आहेत.

मोदी सरकारमधील महाविकास आघाडीबाबत आस्था आणि सहानूभूती असणारा नेता म्हणून नितीन गडकरी यांना राज्यात ओळखलं जातं. नितीन गडकरी सध्या विविध विकास कामांचा आढावा घेत आहेत.

दरम्यान, नितीन गडकरी आणि अशोक चव्हाण यांच्या दिल्लीतील भेटीनं सध्या राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे हे नक्की.

महत्त्वाच्या बातम्या- 

 भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने होणार का?; सौरव गांगुली म्हणतो…

 ‘दंगलीचा कट भाजपच्या ‘या’ नेत्याने रचला’; नवाब मलिकांचा गंभीर आरोप

राज्यात मुसळधार पावसाचं सावट! ‘या’ 13 जिल्ह्यांना अलर्ट जारी

‘बाबासाहेब मला नेहमी म्हणायचे…’; राज ठाकरे यांची भावूक पोस्ट

 “धमकी देऊन न्याय मिळत नाही, न्यायालयात आपली बाजू मांडा”