दूरचा नाही मी तर पुण्याचा जावई आहे- चंद्रकांत पाटील

पुणे : भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आणि सर्वात सुरक्षित मतदारसंघ अशी ओळख असलेल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच कोथरूडमधून त्यांच्या नावाला विरोध झाला होता. ‘दूरचा नको, घरचा पाहिजे, आमचा आमदार कोथरूडचा पाहिजे’ असे फलक कोथरूड परिसरात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून लावण्यात आले होते.

कोथरूडमध्ये लावण्यात आलेल्या या पोस्टरला आणि विरोधाला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फेसबूकवर एक व्हीडिओ पोस्ट करत उत्तर दिले आहे. ‘मी पुण्याचा, मी महाराष्ट्राचा, मी अवघ्या देशाचा आहे’, असं पाटील यांनी या व्हीडिओ मध्ये म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटील यांनी पोस्ट केलेल्या साडेतीन मिनिटांच्या व्हिडीओमध्ये पुणेकरांना मतदान करण्याचे आवाहन केलं आहे. पुणेकरांचे आणि माझे खूप जुने आणि घनिष्ठ नाते आहे. माझी पत्नी पुण्याची आहे, मी दूरचा नाही  मी तर पुण्याचा जावई आहे, असंही त्यांनी आपल्या व्हीडिओमध्ये म्हटलं आहे. 

मी पुण्यात विद्यार्थी सेनेत कार्यरत होतो. त्यामुळे मी पुण्याच्या बाहेरचा नाही. मी तुमच्यापैकीच एक आहे. फलकांना आणि विरोधाला चंद्रकांत पाटील यांनी भावनिक उत्तर दिले आहे.

केंद्रीय नेतृत्वाने मला कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची संधी दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विविध प्रकारे पुण्याशी माझे ऋणानुबंध जोडले गेले आहेत. त्यामुळे मी कोणी परका नसून पुण्याचाच आहे, अशी भावनिक सादही पाटील यांनी या व्हीडिओ द्वारे पुणेकरांनी दिली आहे. 

https://www.facebook.com/ChDadaPatil/videos/376020243351114/

 महत्वाच्या बातम्या-