आदित्य ठाकरेें पाठोपाठ त्यांचा ‘हा’ भाऊ निवडणूक लढवण्याची शक्यता

मुंबई : आदित्य ठाकरे यांच्या रुपाने ठाकरे कुटुंबाचा पहिला सदस्य निवडणुकांच्या रिंगणात उतरला आहे. आदित्य ठाकरेंसोबतच त्यांचा मावसभाऊ वरुण सरदेसाई हेसुद्धा विधानसभा निवडणुकीत उतरणार असण्याची चर्चा आहे. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सरदेसाई निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची चिन्हं आहेत.

युतीच्या जागावाटपात शिवसेनेने आग्रहाने भाजपकडून कल्याण पश्चिम मतदारसंघ मागून घेतला आहे. या मतदारसंघाबाबत सेनेने चाचपणी केली आहे. कल्याण पश्चिमसाठी शिवसेनेतून विजय साळवी इच्छुक उमेदवार असूनही पक्षनेतृत्वाने त्यांना एबी फॉर्म दिलेला नाही.

वरुण सरदेसाई यांच्याबाबत पक्षात अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही, पण दोन दिवसात उमेदवारीबाबत ठरण्याची शक्यता आहे. 2017 मधील कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीतही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पेलली होती.

2014 मधील लोकसभा निवडणुकीत श्रीकांत शिंदेंसाठी त्यांनी प्रचार केला होता.

ठाकरे कुटुंबातील व्यक्तीने ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात प्रवेश करणं म्हणजे या जिल्ह्यावर अंमल असलेल्या एकनाथ शिंदे यांना पक्षातूनच शह देण्याची खेळी असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या-