शिवसेना प्रवेशाच्या चर्चांवर उर्मिला मातोंडकर यांचा खुलासा!

मुंबई |  काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर उर्मिला मातोंडकर शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. मात्र उर्मिला मातोंडकर यांनी यावर मोठा खुलासा केला आहे. मी आता कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही, असं मातोंडकर यांनी म्हटलं आहे. प्रसारमाध्यमांनी या सर्व अफवांकडे अजिबात लक्ष देऊ नये, याकडे दुर्लक्ष करावं, असं त्यांनी म्हटलं आहे.

उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली होती. त्यामुळे उर्मिला मातोंडकर लवकरच शिवसेनेत प्रवेश करू शकतात, असं सांगितलं जात होतं.

उर्मिला यांनी गेल्याच आठवड्यापूर्वीच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. लोकसभा निवडणुकीत आपल्या पराभवासाठी काँग्रेसमधीलच काही नेते कारणीभूत असल्याची तक्रारही त्यांनी पत्राच्या माध्यमातून तत्कालीन मुंबई प्रदेशाध्यक्ष मिलिंद देवरा यांच्याकडे केली होती.

उर्मिला यांनी लिहलेल्या गोपनीय पत्रातील माहिती बाहेर फुटली होती. या सगळ्यावरून बरेच राजकारण झाले होते. यामुळे उर्मिला मातोंडकर काँग्रेसवर प्रचंड नाराज होत्या. अखेर याच कारणामुळे त्यांनी काँग्रेसमधून बाहेप पडण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान, लोकसभा निवडणूक काँग्रेसकडून लढल्यानंतर विधानसभेची निवडणूक त्या शिवसेनेकडून लढणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. मात्र या चर्चेतली हवा उर्मिलांनी काढून घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या-