“मी एसटी कामगाराचा मुलगा आहे, म्हणून मला…”

पुणे | एसटी महामंडळाचं विलगीकरण व्हावं, या प्रमुख मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. तर भाजपने या संपाला संपूर्ण पाठिंबा दर्शवली आहे. त्यावर आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी भाष्य केलं आहे.

तळेगाव डेपोतील एसटी कर्मचाऱ्यांनी उभारलेल्या आंदोलनात सहभागी होऊन प्रविण दरेकर यांनी पाठिंबा दिला. त्यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

गेंड्याच्या कातडीचं हे ठाकरे सरकार आहे. जे कर्मचाऱ्यांना न्याय देण्याएवजी आंदोलन कसं चिरडलं जाईल याचा प्रयत्न करत असल्याची टीका प्रविण दरेकर यांनी केली आहे.

जर कोणाचा बाप जरी आला तरी हे आंदोलन चिरडू शकत नाही. कारण आता हे आंदोलन केवळ कर्मचाऱ्यांचं राहिलं नसून जनतेच झालं आहे, असंही दरेकर यावेळी म्हणाले आहेत.

मी एसटी कामगाराचा मुलगा आहे, म्हणून मला एसटी कामगारांच्या व्यथा माहिती आहेत. तुटपुंजा पगार आणि अपुऱ्या सोई सुविधा यामुळे कर्मचारी आर्थिक संकटात सापडला असल्याचं देखईल त्यांनी यावेळी सांगितलं.

एसटी कर्मचाऱ्यांसाठी आता ही आरपारची लढाई आहे. त्यामुळे आता असाच एकजुटीने लढा सुरू ठेवण्याची गरज आहे, अशंही दरेकर म्हणाले आहेत.

कितीही नोटीसा आल्या, कितीही धमक्या आल्या, तरी भाजप तुमच्या पाठिशी आहे. तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, असंही दरेकर यावेळी म्हणाले आहेत.

एसटी कामगारांचे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा देखील त्यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

आता ही करो या मरोची लढाई आहे. अन्याय सहन करणारा देखील गुन्हेगार असतो हे लक्षात ठेवा, असंही दरेकर म्हणाले आहेत.

शरद पवारांनी कोल्हापूरच्या अधिवेशनात एसटी क्रमचाऱ्यांचा प्रश्न  15 दिवसात सुटेल, असं आश्वासन दिलं होतं, त्याचं काय झालं, असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-  

“आज बाळासाहेब असते तर संजय राऊतांच्या थोबाडीत मारली असती”

…तर मी माझा पद्मश्री पुरस्कार परत करण्यास तयार – कंगना राणावत

अमरावतीत कलम 144 लागू; तीन दिवस इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय

अमरावती बंदचे हिंसक रुप: आंदोलकांकडून दुकानांची तोडफोड