‘…तर तुमचं ‘कोल्हापुरी पायतान’ हातात घ्या’; राजू शेट्टी आक्रमक

मुंबई | राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांची पिके जास्तीच्या पावसामुळे मातीमोल झाली आहेत. त्यामुळे बळीराजा संकटात आहे. यावरून आता राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी उस्मानाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राज्य सरकारला घेरले आहे. शेतकऱ्यांना पिका विमा मिळायलाचं पाहीजे, अशी मागणी राजू शेट्टी राज्य सरकारकडे केली आहे.

तसेच राजू शेट्टी यांनी विमा कंपन्यावर कारवाई करण्याची मागणी आहे. महाविकास आघाडी सरकारने विमा कंपन्यांवर कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या मुलांना चिमटे काढले. शेतकऱ्यांच्या पोरांनी आता सतरंज्या उचलायचं बंद करा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रूमणा हातात घ्या, असं वक्तव्य राजू शेट्टी यांनी केलं आहे.

दरम्यान, राजू शेट्टी उस्मानाबाद दौऱ्यावर असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला मिळणारा भाव यावरून ते शेतकऱ्यांमध्ये जागृती करताना दिसत आहेत.

आम्ही उसाचा दांडका हातात घेऊन कोल्हापूरच्या कारखानदारांना वठणीवर आणलं. तुम्ही गप्प का बसता आवाज उठवा. कोल्हापूरची माणसं नुसतीच कोल्हापूरी पायतान घातल नाहीत, वेळेप्रसंगी पायातली कोल्हापुरी हातातही घ्यायला शिका, असा सल्ला देखील त्यांनी कोल्हापूरात दिला आहे.

राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर देखील आसूड ओढला आहे. केंद्र सरकारने परदेशातील पेंड आयात केल्यामुळे सोयाबिनचे भाव घसरले, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

सोयाबिनच्या पामतेलाचा 30 टक्के आयात कर हा शुन्य टक्क्यावर आणल्यामुळे सोयाबिनचे भाव उतरले आहेत, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. तसेच जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असं म्हणतं राजू शेट्टी यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारला सुनावले आहे.

तसेच राजू शेट्टी यांनी ऊसाला एकरकमी एफआरपी देण्यावरूनही राज्य सरकारकडे वारंवार मागणी केली आहे.शेतकरी संघटीत नसल्यामुळे कारखानदार शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम देत नाहीत, असंही राजू शेट्टी म्हणाले आहेत.

राज्यभरात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी बळीराजाचं पुर्णत: नुकसान झालं आहे तर काही ठिकाणी अंशत: नुकसान झाले आहे. पिक विमा कंपन्या नुकसान भरपाईची रक्कम देण्यास टाळाटाळ करत आहेत, असा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, राजू शेट्टी यांनी पिक विम्याच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेतलेली आहे. शेतकऱ्यांना पिकविम्याची रक्कम मिळाली नाही तर शांत बसणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-  
“आज बाळासाहेब असते तर संजय राऊतांच्या थोबाडीत मारली असती”

…तर मी माझा पद्मश्री पुरस्कार परत करण्यास तयार – कंगना राणावत

अमरावतीत कलम 144 लागू; तीन दिवस इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय

अमरावती बंदचे हिंसक रुप: आंदोलकांकडून दुकानांची तोडफोड

  ’50 रुपयांनी पेट्रोल-डिझेलचे दर कमी करायचे असतील तर…’; संजय राऊत यांनी सूचवला पर्याय