‘…मला अजूनही सुशांतचा आवाज ऐकू येतो’; सुशांतच्या आठवणीत त्याची एक्स गर्लफ्रेंड व्याकूळ

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने ऐन तारुण्यात अचानक घेतलेली एक्झिट हा सर्वांसाठी एक खूप मोठा धक्का होता. सुशांतच्या मृत्यूला वर्ष लोटून गेलं तरी देखील अद्याप त्याचे चाहते आणि मनोरंजन विश्वातील त्याचे सहकलाकर त्याला विसरलेले नाहीत. सुशांतच्या आठवणीत अनेक कलाकार सोशल मीडियावर सतत काही ना काही शेअर करताना दिसतात.

झी वाहिणीवर प्रदर्शित होणाऱ्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून सुशांत सिंह राजपूत घराघरात पोहोचला होता. या मालिकेत त्याची सहकलाकार आणि रिअल लाईफमध्ये गर्लफ्रेंड राहिलेल्या अभिनेत्री अंकिता लोखंडेला देखील सुशांतच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतर मोठा धक्का बसला होता.

अंकिताने सोशल मीडियावर त्याच्या अनेक आठवणी शेअर करत त्याला श्रद्धांजली वाहिली होती. अंकिता पवित्र रिश्ताच्या दुसऱ्या पर्वाच्या शुटींगमध्ये सध्या व्यस्त आहे. पवित्र रिश्ताच्या पहिल्या पर्वात अंकिताने अर्चनाची तर सुशांतने मानवची भूमिका साकारली होती.

सुशांतच्या मृत्यूला आता वर्ष लोटून गेलं आहे तरी देखील अंकिता सुशांतला विसरू शकली नाही. नुकतीच दिलेल्या एका मुलाखतीत अंकिताने तिला मानवमध्ये सुशांतचा आवाज ऐकू येत असल्याचं म्हटलं होतं.

पवित्र रिश्ता 2 मध्ये रोमॅंटिक सीनला कशाप्रकारे सामोरं जावं लागलं? असा सवाल अंकिताला मुलाखतीमध्ये करण्यात आला होता. यावर उत्तर देताना अंकिता म्हणाली की, जेव्हा मी एखाद्याला मानव म्हणून पाहते तेव्हा मला थोडेसे वेगळे वाटते.

परंतु जेव्हा मी स्क्रिप्टमध्ये अर्चना मानव लिहिलेले पाहते तेव्हा मला मानवमध्ये सुशांतचा आवाज ऐकू येता. कारण मला सुशांत हे कसं बोलणार हे माहित आहे आणि मी तसा अभिनय करते, असं अंकिताने यावेळी म्हटलं आहे.

तसेच पुढे बोलताना अंकिता म्हणाली की, मी फक्त सुशांतसोबतच काम केलं नाही. मी इतर कलाकारांसोबत देखील काम केलं आहे. मला एखाद्या झाडासोबत रोमान्स करायला लावला तरी देखील मी तो करेल. आम्ही एक कलाकार आहोत आमचं ते कामच आहे.

महत्वाच्या बातम्या-

बोटमध्ये चप्पल घालून चढणाऱ्या ‘या’ बड्या अभिनेत्रीला अटक

सिद्धार्थची ‘त्या’ रात्रीच्या अर्ध्या तासाची कॉल हिस्टरी समोर, विशालने केला खुलासा

…म्हणून मामा भाच्यातील वाद पेटला; वाचा गोविंदा आणि कृष्णातील भांडणाचं कारण

दुसऱ्या तरूणीसोबत गर्लफ्रेंडनं बॉयफ्रेंडला रंगेहात पकडलं, अन् मग…; पाहा व्हिडीओ

‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री केतकी चितळे गजाआड जाणार?