“महाराष्ट्र संकटात असताना घरात बसणं मला जमलं नाही”

मुंबई | मागील दोन वर्षापासून कोरोना (Corona) महामारीमुळे जगभरात थैमान घातलं होतं. कोरोनामुळे अनेकांचा मृत्यू देखील झाला. अनेकांना आपल्या जवळच्या व्यक्तीला गमवावं लागलं.

कोरोनामुळे अर्थव्यवस्थेसह आरोग्य व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा पुरवण्यात आली. त्यासाठी अनेक यंत्रणा कामाला लागल्या होत्या.

अशातच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्र कोरोनामुक्त होत असल्याने त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कामाचं कौतुक केलं.

आपण ऐका एका संकटातून जातोय. महाराष्ट्र संकटात असताना घरात बसणं मला जमलं नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत.

कोरोनामुळे अनेकांना घर बंद करून आत बसावं लागलं. त्यामुळे सर्वांचं काम थांबलं होतं. मंत्रीमंडळातले मंत्री चांगले काम करत होते, असं म्हणत त्यांनी मंत्र्यांचं कौतुक केलंय.

मी तेव्हा ठिकठिकाणी फिरलो मला तेव्हा सांगायचे घरात बसा मात्र महाराष्ट्र संकटात असताना घरात बसणं मला जमलं नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात आपलं भाग्य आहे म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,अजित पवार यांनी दिवसाची रात्र करून सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केला, असंही शरद पवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या –

“हे माझ्यासाठी नाही, मला वरपर्यंत द्यावं लागतं”; महिला इन्स्पेक्टरला अटक

“…म्हणून भारताने रशिया किंवा युक्रेनची बाजू घेतली नाही”, शरद पवारांनी सांगितलं कारण

“संजय राऊतांच्या जीभेला हाड उरलंच नाही, जनाची मनाची…”

“नारायण राणेंनाही अटक झाली होती, तुम्ही त्यांचा राजीनामा घेतला का?”

शरद पवारांनी नरेंद्र मोदींना दिला महत्वाचा सल्ला, म्हणाले…