“हे वरपर्यंत द्यावं लागतं”; अटकेनंतर महिला इन्स्पेक्टरचा धक्कादायक खुलासा

मुंबई | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजेच अँटीकरप्शन ब्युरो शासन व्यवस्थेला लागलेल्या भ्रष्टाचाराच्या कि़ड्यापासून वाचवण्याचं काम करतं.

अशातच जयपूरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत ड्रग इन्स्पेक्टरला अटक केली आहे. पाच हजार रूपयांची लाच घेताना ड्रग इन्स्पेक्टरला पकडण्यात आलं आहे.

अटक केल्यावर ड्रग इन्स्पेक्टरने धक्कादायक खुलासा केला आहे. त्यानंतर आता जयपूरात एकच चर्चा होताना दिसत आहे.

सिंधु कुमारी असं लाच घेणाऱ्या महिला ड्रग इन्स्पेक्टरचं नाव आहे. जयपूरमध्ये असलेल्या 500 मेडिकल स्टोअर्सची तपासणी करण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती.

मात्र, त्या दरमहिन्याला प्रत्येक मेडिकल स्टोअर्समधून पाच हजार रूपये गोळा करत होत्या. त्यानंतर एकेदिवशी एका मेडिकल स्टोअर्स मालकाने त्यांची तक्रार अँटीकरप्शन ब्युरोकडे केली.

गेल्या अनेक दिवसांपासून ड्रग इन्स्पेक्टर लाच घेत असल्याची तक्रार केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून लाच घेताना पकडलं.

अटक केल्यावर ड्रग इन्स्पेक्टरने धक्कादायक खुलासा केला आहे. हे माझ्या एकटीसाठी नाही तर, मला वरपर्यंत पैसे द्यावे लागतात, असं ड्रग इन्स्पेक्टर सिंधु कुमारीने सांगितलं आहे.

दरम्यान, या प्रकरणात आता अनेक मोठे अधिकारी सापडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या-

“…म्हणून भारताने रशिया किंवा युक्रेनची बाजू घेतली नाही”, शरद पवारांनी सांगितलं कारण

“संजय राऊतांच्या जीभेला हाड उरलंच नाही, जनाची मनाची…”

“नारायण राणेंनाही अटक झाली होती, तुम्ही त्यांचा राजीनामा घेतला का?”

शरद पवारांनी नरेंद्र मोदींना दिला महत्वाचा सल्ला, म्हणाले… 

“राज्यपाल हे भापजचे प्रदेशाध्यक्ष असल्यासारखं काम करतात”