मला असं वाटतच नाही की मी मुख्यमंत्री नाही- देवेंद्र फडणवीस

नवी मुंबई | मला असं वाटतच नाही की मुख्यमंत्री नाही. मला जणतेने कधीच जाणवू दिलं नाही की मी मुख्यमंत्री नाही. मी आजही मुख्यमंत्री आहे हेच तुम्ही मला जाणवून दिलं आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते नवी मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते.

मला तर वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे. गेले दोन वर्ष सातत्यानं राज्यभर फिरतोय. लोकांचं प्रेम अजिबात कमी झालेलं नाही. माणूस कोणत्या पदावर आहे ते महत्त्वाचं नाही. तो काय काम करतो हे जास्त महत्त्वाचं, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले

गेली दोन वर्ष एकही दिवस घरात न थांबता मी जनतेच्या सेवेमध्ये आहे. त्यामुळे मला जनतेनेही कधी मी मुख्यमंत्री नसल्याचं जाणवू दिलं नाही. विरोधी पक्षनेता म्हणून मी उत्तम करत आहे, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे.

ज्या दिवशी मला जनतेचा आशीर्वाद मिळेल त्या दिवशी इथे मी देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी येईल. त्यामुळे त्याची काळजी घेऊ नका. मी नक्की येईल. तुमचं निमंत्रण मी आजच स्विकारतो, असंही ते म्हणाले.

नवी मुंबईत आम्ही पुन्हा निवडून येऊ असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे. तसेच यावेळी त्यांनी मंदाताई म्हात्रे यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

दरम्यान, आमच्या मंदाताई महिलांचं सशक्तीकरण करण्यात नेहमीत पुढाकार घेत असतात, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी मंदाताई म्हात्रेंचं कौतुक केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“मी बिग बॅासमध्ये गेल्यामुळे काही लोकांपर्यंत कीर्तन परंपरा पोहोचली”

‘भाजपमध्ये लोकशाहीला जागा उरली नाही’; भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या ‘या’ बड्या नेत्याची टीका

सोनं घेण्याची सुवर्णसंधी; ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त झालं सोनं

‘हे’ शेअर्स खरेदी केल्यास लखपती होण्याची संधी, जाणून घ्या अधिक

भर मंडपातच नवरा-नवरीचा सुरू होता रोमांन्स अन्…, पाहा व्हिडीओ