“मी बिग बॅासमध्ये गेल्यामुळे काही लोकांपर्यंत कीर्तन परंपरा पोहोचली”

पंढरपूर | बिग बॉस हा शो वारकरी संप्रदाय पाहत नाही, हे मलाही माहित आहे. मात्र ज्या प्रेक्षकांना वारकरी परंपरा माहिती नव्हती त्या प्रेक्षकांचं कीर्तनाच्या माध्यमातून विचार परिवर्तन केलं, असं प्रसिद्ध कीर्तनकार शिवलीला पाटील म्हणाल्या आहेत. त्या ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होत्या.

बिग बॉसच्या घरात जाण्याचा माझा हेतू चांगला होता कीर्तनाच्या माध्यमातून आध्यात्मिक शिकवण देण्याचा विचार असल्याचं शिवलीला पाटील यांनी सांगितलं आहे. वारकरी संप्रदाय आणि ज्येष्ठ मंडळी नाराज होते. त्यांच्याशी बातचीत करूनच निर्णय घ्यायला पाहिजे होता, असं देखील त्या म्हणाल्या.

‘बिग बॉस’मध्ये आपल्या धर्माची संस्कृती,  आपला संप्रदाय,  माझे कीर्तन,  माझी तुळशीमाळ अख्ख्या महाराष्ट्राला दिसावी,  म्हणून बिग बॉस मध्ये गेले, असं शिवलीला पाटील यांनी सांगितलं.

मी तिथं राहून वारकरी संस्कृतीचे दर्शन घडवलं असून, त्याठिकाणी अभंगावर बोलले,  ज्ञानेश्वरी वाचन करणं तुळशीचं पूजन सोडलं नाही. वारकरी संस्कृती जपूनच बिग बॉसच्या घरात राहिले असल्याची माहिती कीर्तनकार शिवलीलाताई पाटील यांनी आपल्या कीर्तनाच्या सुरुवातीला दिली. एव्हढंच नव्हे तर जिजाऊंची लेक असल्याने कोणालाही घाबरत नसल्याचा इशाराही शिवलीला पाटील यांनी दिला आहे.

दरम्यान, शिवलीला पाटील या ‘बिग बॉस मराठी’च्या सीजन 3 मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या होत्या. या शोमध्ये त्यांचं वागणं त्यांच्या कीर्तनापेक्षा पूर्णपणे वेगळं जाणवलं होतं. त्यामुळे चाहते त्यांच्यावर प्रचंड नाराज झाले होते. त्यांच्यावर मोठ्या प्रमणात सोशल मीडियावर टीका होऊ लागल्या होत्या. त्यानंतर त्यांनी शोमधूून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.

महत्वाच्या बातम्या-

‘भाजपमध्ये लोकशाहीला जागा उरली नाही’; भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या ‘या’ बड्या नेत्याची टीका

सोनं घेण्याची सुवर्णसंधी; ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त झालं सोनं

‘हे’ शेअर्स खरेदी केल्यास लखपती होण्याची संधी, जाणून घ्या अधिक

भर मंडपातच नवरा-नवरीचा सुरू होता रोमांन्स अन्…, पाहा व्हिडीओ

माणसांप्रमाणे चिंपांजीने धुतले कपडे, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल