‘माझ्याकडे या व्यक्तीचे आणि एका महिलेचे ‘नग्न फोटो होते’; भाजपमधील वाद चव्हाट्यावर

जळगाव | गेल्या काही दिवसांपासून पक्षांतर्गत चाललेले अनेक वाद समोर येत आहेत. सध्या असाच वाद भाजप पक्षात चालू आहे. भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध जणू मोर्चाच काढला आहे. खडसे यांनी फडणवीसांवर आरोप करत पक्षांतर्गत चालणाऱ्या अनेक गोष्टींचा खुलासा माध्यमांशी बोलताना केला आहे.

पक्षातील एका मंत्र्यांचा पीए आणि एका महिलेचे न.ग्न फोटो माझ्याकडे होते. हे फोटो मी पक्षातील वरिष्ठ नेत्यांना देखील दाखवले आहेत. तसेच पक्षातील नेत्यांचे आणि त्यांच्या जवळच्या लोकांचे काय उद्योग चालतात याची माहिती देखील मी वरिष्ठांना दिली आहे, असा खुलासा एकनाथ खडसे यांनी केला आहे.

माझ्यावर आत्तापर्यंत अनेक खोटे आरोप केले गेले. मात्र, माझ्यावर केलेले आरोप सिध्द करू शकले नाहीत. जाणिवपूर्वक मला पदावरून बाजूला काढण्याचा प्रयत्न केला गेला. भ्र.ष्ट लोकांना पक्षात घेतलं गेलं. मात्र ज्यांनी पक्षासाठी आपल्या जिवनातील 40 वर्षे जिवाचं रान केलं. पक्षाशी एकनिष्ठ राहून काम केलं. त्यांच्या जिवाची पक्षाला कदर नाही का?, असा सवाल एकनाथ खडसे यांनी  केला आहे.

पक्षांतर्गत माझ्याविरुद्ध ष.डयंत्र रचलं गेलं. पक्षांतर्गत हे ष.डयंत्र कोणी रचलं?, यात कोण कोण सामील आहे?, या सर्व गोष्टी मला माहित आहेत. या सर्व गोष्टींचे पुरावे देखील माझ्याकडे आहेत, असंही एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

तसेच अंजली दमानिया यांना कोण कोण भेटायला जात होतं, याच्या देखील व्हिडिओ क्लिप्स माझ्याकडे आहेत. काही पुरावे मी वरिष्ठांना दाखवले आहेत. राहिलेले पुरावे मी वेळ आल्यावर बाहेर काढणार आहे, असंही एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला होता. दहा-पंधरा वर्षांपूर्वी पक्षात आलेले नेते आम्हाला अक्कल शिकवायला लागले आहेत, अशा खरमरीत शब्दात एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला होता. तसेच मी मुख्यमंत्री पदाचा दावेदार असल्यामुळे नेहमी मला संपवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र मी सहजासहजी संपणारा राजकारणी नाही, असंही एकनाथ खडसे यांनी म्हटलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

रिया चक्रवर्ती एनसीबीच्या रडारवर; भाऊ शौविकनेच दिली रियाविरुद्ध कबुली म्हणाला…

सुशांत प्रकरणी न्यायालयाची मोठी सुनावणी; ‘या’ दोघांना 9 सप्टेंबरपर्यंत कोठडी

सीबीआय टीम पुन्हा एकदा सुशांतच्या घरी; अधिकाऱ्यांनी केला ‘हा’ मोठा खुलासा

“…म्हणून नेहमी मला संपवण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र मी सहजासहजी संपणारा राजकारणी नाही”

सुशांतप्रकरणी मोठी कारवाई ! बंगळुरूमधून ‘या’ बड्या अभिनेत्रीसह दोघांना अ. टक