“उद्धव ठाकरेंना भेटलो…”, शिवसेना-वंचित युतीबाबत प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

अकोला | राज्यात मागील काही दिवसांपासून सत्ता समीकरण बदलत असल्याचं दिसत आहे. महाविकास आघाडीत पक्ष आता एकमेकांविरूद्ध माध्यमांसमोर बोलत असल्याचं पहायला मिळत आहे.

काँग्रेसचे आमदार नाराज असल्याचं पहायला मिळत आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे यांच्या सभेनंतर भाजप आणि मनसेमध्ये युतीची शक्यता आहे.

अशातच आता वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये युती होण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेसोबत देखील वंचित आघाडीची चर्चा सुरू असल्याचं पहायला मिळत होतं.

अशातच आता अकोल्यातील पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. भविष्यात शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी होऊ शकते, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एकदा भेटलो देखील होतो. मात्र ही चर्चा पुढे गेली नाही, असं ते आंबेडकर म्हणाले आहेत. त्यावेळी त्यांनी एक खंत देखील व्यक्त केली आहे.

आपल्यासोबत कोणीच लग्न करायला तयार नाही, फक्त फिरवायला तयार असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

दरम्यान, त्यांनी शरद पवार यांच्या हल्ल्याप्रकरणी मुंबईचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचं निलंबन करावं, अशी मागणी देखील प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

व्यावसायिक संजय बियाणी हत्येप्रकरणी अत्यंत खळबळजनक माहिती समोर!

मंत्री धनंजय मुंडेंच्या तब्येतीसंदर्भात अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती! 

“राज ठाकरेंच्या सभांमुळे करमणूक होते, त्यांना फार गांभीर्यानं घेण्याची गरज नाही”

‘…त्यासाठी सकाळी लवकर उठावं लागतं’; शरद पवारांचा राज ठाकरेंना खोचक टोला 

सर्वात मोठी बातमी; राज ठाकरेंवर गुन्हा दाखल