“कंगणा जे म्हणाली ते खरंय, मी समर्थन करतो त्या वक्तव्याचं”

पुणे | आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. सर्वांच्या त्यागानं या देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे. अशातच आता बाॅलिवूड अभिनेत्री कंगना रनौतनं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

आपल्या अभिनयानं कमी आणि आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी कंगणा रनौत सध्या जास्त प्रसिद्धी झोतात आहे. परिणामी तिने आता पुन्हा देशाच्या स्वातंत्र्य लढ्यावर जावई शोध लावला आहे.

एका कार्यक्रमात बोलताना कंगणानं चक्क देशाच्या स्वातंत्र्याला भीकेत मिळाल्याचं म्हटलं होत. 1947 साली देशाला भीक मिळाली होती, खरं स्वातंत्र्य तर 2014 साली मिळाल्याचं वादग्रस्त वक्तव्य कंगणानं केलं होत.

सर्वच स्तरातून कंगणावर टीका होत आहे. अशातच ज्येष्ठ मराठी कलाकार विक्रम गोखले हे कंगणाच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत.

कंगणा जे म्हणाली ते खरंय, मी कंगणाच्या वक्तव्याचं समर्थन करतो, असं वक्तव्य गोखले यांनी केलं आहे. परिणामी या प्रकरणाला आता नवीन वळण मिळालं आहे.

कंगणा रनौत हे वक्तव्य केल्यावर देशभरातून कंगणावर जहरी टीका होत असताना विक्रम गोखले यांनी कंगणाचं समर्थन केल्यानं सर्वस्तरातून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

‘कोणाच्याही मदतीनं स्वातंत्र्य मिळालं नाही. आपले स्वातंत्र्यवीर फासावर जात असताना त्यांना वाचवण्याचं धाडस कोणी केलं नाही, सर्वजण बघत राहीले’, असंही गोखले म्हणाले आहेत.

कंगणाच्या समर्थनार्थ वक्तव्य करताना विक्रम गोखले यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानावर देखील भाष्य केलं आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देताना त्यांच्या मदतीला सर्वांनी यायला हवं होतं, असंही गोखले म्हणाले आहेत.

कंगणा रनौतच्या वादग्रस्त वक्तव्यावरून सध्या देशात गोंधळ सुरू आहे. कंगणाला दिला गेलेला पद्मश्री पुरस्कार परत घेण्याची मागणी देखील करण्यात येत आहे.

दरम्यान, मी कोणत्याही स्वातंत्र्यसैनिकाचा अपमान केला नाही. मी अपमान केल्याचं जर कोणी सिद्ध करू शकलं तर मला मिळालेला पद्मश्री पुरस्कार मी परत देईल, असं उत्तर टीकाकारांना कंगणानं दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

“खरंच हिंदू खतरे में है तर मोहन भागवतांनी दिल्लीत मोर्चा काढावा” 

“…तर मुंबईत हिंदू जिवंत नसता, आता हिंदुहृदयसम्राटांचे वारसदार बोलणार नाहीत का?” 

“गाईचं शेण अन् गोमुत्रामुळे अर्थव्यवस्था मजबूत होते आणि …” 

मोठी बातमी! मुंबईतील वांद्रे रेल्वे पोलिसांना आलेल्या निनावी फोनमुळे खळबळ, दिली ही धमकी 

“कोरोना काळात मुख्यमंत्री पैसे मोजण्यात व्यस्त म्हणून मानेचा त्रास”