“मला काही लोकांकडून संपर्क करण्यात आला, पण…”; रिकी पाॅंटिंगचा धक्कादायक खुलासा

नवी दिल्ली | भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी द वाॅल नावानं प्रसिद्ध असणारा दिग्गज फलंदाज राहुल द्रविड यांची निवड नुकतीच झाली आहे. राहुल द्रविडच्या अगोदर या पदासाठी जगातील सर्वात यशस्वी कर्णधार रिकी पाॅंटिंगच्या नावाची चर्चा होती.

भारतीय क्रिकेट मंडळ हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ आहे. परिणामी भारतीय प्रशिक्षकाला जगातील सर्वोत्तम पगार मिळत असतो. हे असतानाही पाॅंटिंग यांनी नकार दिल्यानं चर्चा रंगली होती.

रिकी पाॅंटिंग यांच्याच नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया संघानं दोन विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला होता. परिणामी पाॅंटिंग यांच्या नेतृत्वावर जगातील सर्वांनाच विश्वास आहे.

पाॅंटिंग यांनी आता भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाबाबत विचारलं असता अनेक खुलासे केले आहेत. मला भारतीय क्रिकेट मंडळाकडून प्रशिक्षकपदाबाबत विचारण्यात आल्याचं रिकी म्हणाले आहेत.

आयपीएलमध्ये पाॅंटिंग सध्या दिल्ली कॅपीटल्सचा प्रशिक्षक म्हणून काम करतो. आयपीएलमध्ये आतापर्यंत दिल्लीनं पाॅंटिंगच्या काळात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

मला काही लोकांकडून संपर्क करण्यात आला होता. पण माझ्या कामाच्या ताणामुळं मी भारतीय संघाचा प्रशिक्षक होण्यास नकार दिला आहे, असं पाॅंटिंग म्हणाले आहेत.

जर मी ही ऑफर स्विकारली असती तर मला प्रचंड ताण आला असता. मला आयपीएल सोडावे लागले असते. आणि क्रिकेटशी संबंधित अनेक गोष्टीनां मुकावे लागले असते.

राहुल द्रविडनं ही ऑफर स्विकारल्याबद्दल पाॅंटिंगनं आश्चर्य व्यक्त केलं आहे. कुटुंब असूनही राहुल द्रविडने हे काम करण्यास होकार दिल्याबद्दल म्हणाला, मला आश्चर्य वाटते की द्रविडने ही ऑफर स्वीकारली आहे.

अंडर-19 च्या भूमिकेत तो किती खूश होता, याबद्दल बरीच चर्चा झाली आहे. मला त्याच्या कौटुंबिक जीवनाबद्दल माहिती आहे, त्यामुळे त्याने ही जबाबदारी उचलण्यास होकार दिल्याने मला आश्चर्य वाटले, असं वक्तव्य पाॅंटिंगनं केलं आहे.

दरम्यान, रिकी पाॅंटिंगचा प्रशिक्षक म्हणून आतापर्यंतचा कालावधी यशस्वी असल्यानं त्याच्या नावाचा विचार करण्यात आल्याचं बीसीसीआयच्या सुत्रांनी सांगितलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “आरक्षणासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला, आता आम्हीही उतरावं का?”

 “नियती माफ करणार नाही, प्रत्येक सेकंदाची किंमत भाजपला चुकवावी लागेल”

 अभिनेत्री प्रिती झिंटानं दिली गूड न्यूज! वयाच्या 46व्या वर्षी बनली जुळ्या मुलांची आई

  भर सामन्यात चहर आणि गप्टीलची नजरेची खुन्नस, पाहा व्हायरल व्हिडीओ

  “संजय राऊत यांना मी माझा पगार देतो, त्यांनी त्यांचं घर चालवून दाखवावं”