ठाकरे सरकारला देवेंद्र फडणवीसांचा गंभीर इशारा, म्हणाले…

मुंबई | राज्यात सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगितुरा रंगल्याचं पहायला मिळत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस राजकीय वर्तुळातील वातावरण पेटत असल्याचं पहायला मिळत आहे.

राज्यात दोन्ही पक्षांमध्ये शाब्दिक चकमक सुरु असताना अशातच आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणींत वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे.

बदल्यांबाबतचा गोपनीय अहवाल लीक झाल्याप्रकरणात आज पोलिसांनी देवेंद्र फडणवीसांच्या घरी जाऊन त्यांची दोन तास चौकशी केली.

फडणवीसांच्या झालेल्या चौकशीवरुन भाजपनं निषेध व्यक्त केला आहे. त्यामुळे सध्या वातावरण जोरदार पेटल्याचं पहायला मिळत आहे .

चौकशीनंतर फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत संताप व्यक्त केला आहे. हा घोटाळा मी बाहेर काढला आहे आणि तो न्यायालयाने सुद्धा मान्य केला आहे. पोलिसांना मी सांगितलं, मी जबाबदार नेत्यासारखा वागलो. त्यासंदर्भातील पत्रही मी पोलिसांना दाखवलं.

सरकारकडून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरकारच्या या दबावासमोर झुकणार नसल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

यापुढेही मी राज्य सरकारचे घोटाळे बाहेर काढणार आहे, असा इशाराही देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे. त्यामुळे आता वातावरण आणखी चिघळणार असल्याचं दिसत आहे.

मला नोटीस पाठवण्यामागचं कारण सभागृहात मी मांडत असलेले विषय आहेत. दाऊदसोबत सरकारच्या मंत्र्यांचं कनेक्शन किंवा विरोधी पक्षाबाबत सरकार करत असलेलं षडयंत्र हे विषय मी काढले. म्हणून अचानक अशी नोटीस मला देण्यात आली, असंही फडणवीसांनी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या –

  “बाहेर पडलं की पाऊस अन् टिव्ही लावला की संजय राऊत”

“राष्ट्रवादीचे सर्वच नेते भ्रष्टाचाराने माखलेले, सगळे जेलमध्ये जाणार” 

“काही लोक आता जेलमध्ये सकाळच्या पत्रकार परिषदेची परवानगी मागतील” 

“नरेंद्र मोदींच्या तुलनेचा नेता आज लोकांसमोर नाही” 

पुरूषांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; ‘या’ सवयी करतील मोठं नुकसान