मुंबई | महाराष्ट्रात दोन महिन्यांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी 25 हजार रूपये मदत देण्याची मागणी केली आहे. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे. देेवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदी यांचे संबंध चांगले असल्याने मी त्यांना पंतप्रधानांकडे घेऊन जाणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आर्थिक साहाय्य करण्याची मागणी राज्यातील भाजप नेतृत्वाने केंद्राकडे करावी, असंही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्रीपदाचा पदभार घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉलही केला होता, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
आरेतल्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतल्यानंतर सर्व प्रकल्पांचा आढावा घेतला जाणार असला तरी आकसाने निर्णय घेतले जाणार नाही. आधी आढावा घेतला जाईल आणि नंतरच कोणताही निर्णय घेतला, असंही उद्धव म्हणाले.
दरम्यान, केंद्र सरकारने महाराष्ट्राशी आकसाने वागू नये. महाराष्ट्रातल्या बळीराजाला मदत करावी, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
महत्त्वाच्या बातम्या-
कुणाला कोणतं खातं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी खातेवाटपाची तारीख केेली जाहीर! – https://t.co/Q54DD2Ofw2 @ShivSena @NCPspeaks @INCMaharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 2, 2019
आव्हाडांनी मागणी अन् उद्धव ठाकरेंनी लगोलग घेतली दखल! – https://t.co/CpxGn2ixMi @uddhavthackeray @Awhadspeaks @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 2, 2019
पंकजा मुंडे भाजप सोडणार???; त्यांच्या समर्थक आमदाराचा मोठा खुलासा – https://t.co/2Mm0Z93EKS @MahadevJJankar @Pankajamunde @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 2, 2019