वोडाफोननंतर आता एअरटेलचे रिचार्जही महागले!

मुंबई | वोडाफोन-आयडियानंतर आता एअरटेल रिचार्जच्याही किमतीत वाढ करण्यात आली आहे. एअरटेलच्या प्रीपेड ग्राहकांच्या कॉल आणि इंटरनेट डाटा प्लॅनच्या किमतीतही वाढ होणार आहे, अशी घोषणा आज एअरटेलने केली आहे. याआधी वोडाफोन आणि आयडियानेही कॉल आणि इंटरनेट डाटाच्या किमतीत वाढ केली होती.

भारती एअरटेलने प्रीपेडच्या कॉल आणि इंटरनेट रिचार्जच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.  हे नवे दर 3 डिसेंबर 2019 पासून लागू होणार आहे. कंपनीचा आता सर्वात स्वस्त प्लॅन हा 49 रुपयांचा असणार आहे, असं भारती एअरटेलने सांगितलं.

नवीन रिचार्ज प्लॅननुसार, जकात दरात प्रति दिन 50 पैसे ते 2.50 रुपयांची वाढ झाली आहे. याशिवाय कंपनी एअरटेल थँक्स प्लॅटफॉर्मच्या आधारावर ग्राहकांना एक्स्क्लुझिव्ह ऑफर देणार आहे.

दरम्यान,काही तासांपूर्वी वोडाफोन-आयडियाने आपल्या कॉल आणि इंटरनेट सेवेत वाढ केली आहे. कंपनीने प्रीपेड युजर्ससाठी दोन दिवस, 28 दिवस, 84 दिवस आणि 365 दिवसांच्या नव्या प्लॅनची घोषणा केली.

महत्वाच्या बातम्या-