“सध्याचं सरकार गाडीमागे धावणाऱ्या कुत्र्यासारखं”

नागपूर | नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन देशात असंतोष आहे. अनेक राजकीय पक्षांसह अनेक संघटनांनी या कायद्याला विरोध केला आहे. माजी सनदी अधिकारी कन्नन गोपीनाथन यांनीही या कायद्यावरुन सरकारला लक्ष्य केलं आहे. त्यांनी या सरकारला कुत्र्याची उपमा दिली आहे. ते नागपुरमधील एका कार्यक्रमात बोलत होते.

गाडीमागे भुंकत धावणारे कुत्रे जिवाच्या आकांताने धावत असते. मात्र, ते गाडीज‌वळ पोहोचले किंवा आपण गाडी थांबविली तर चाकाजवळ गेल्यावर त्या कुत्र्याला काय करायचं ते कळत नाही. तसेच सध्याच्या सरकारचे झाले आहे. निर्णयही घेत आहेत, मात्र त्यानंतर काय करायचे हेच त्यांना माहिती नाही, अशी कडवट टीका त्यांनी केली आहे.

एके दिवशी अचानक नोटबंदीचा निर्णय घेतला, घाईत जीएसटी लागू केला, एक दिवस 370 हटविले आता अचानक नागरिकत्व सुधारणा कायदा तयार केला आहे, असं म्हणत कन्नन यांनी हे सरकार मूर्ख असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, कलम 370 हटविणे हा चुकीचा निर्णय असून काश्मिरींच्या स्वातंत्र्यावर गदा घालणे अमानवीय असल्याचा आरोप करत कन्नन यांनी पदाचा राजीनामा दिला होता.

महत्वाच्या बातम्या-