31 मार्चपर्यंत केवायसी करा अन्यथा तुमचे बँक खाते देखील होईल बंद, ‘या’ बँकेचे ग्राहकांना आवाहन

नवी दिल्ली |  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांना केवायसी अपडेट करणे अ.निवार्य केलं आहे. कोणतेही नवीन खाते उघडण्यासाठी ग्राहकांना केवायसी आवश्यक आहे. केवायसीसाठी ओळख व पत्त्याच्या पुराव्यांसाठी काही कागदपत्रे ग्राहकांना बँकेत सादर करावी लागतात.

आयडीबीआय बँकेने देखील केवायसी संदर्भात ग्राहकांसाठी महत्वाचे फर्मान काढले आहे. जर तुम्ही आयडीबीआय बँकेचे ग्राहक असाल तर 31 मार्चपर्यंत तुम्हाला केवायसी करणे गरजेचं आहे. नुकतंच बँकेने यासंबंधित अधिसूचना काढत ग्राहकांना केवायसी अद्ययावत करण्यास सांगितले आहे.

आयडीबीआय बँकेने काढलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, ग्राहकांना कोणत्याही अडचणीशिवाय बँकिंग सेवा सुरु ठेवायची असल्यास 31 मार्चपर्यंत केवायसी अपडेट करावी लागेल.

ग्राहक केवायसीची कागदपत्रे त्यांच्या जवळच्या आयडीबीआय शाखेत सादर करू शकतात. याव्यतिरिक्त केवायसी करण्यासाठी ग्राहकांना इतर कोणतीही सु.विधा दिली जाणार नाही. आयडीबीआय बँकेने ट्वीट करत यासंबंधित माहिती दिली आहे.

केवायसी करण्यासाठी आयडीबीआय बँकेच्या मते ग्राहकांना पॅनकार्ड किंवा फॉर्म 60 भरावा लागतो. तसेच यासोबत ग्राहकांना ओळख म्हणून इतरही काही कागदपत्रे बँकेत जमा करावी लागतील.

ओळखपत्र पुरावा म्हणून पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, नरेगा जॉ.ब कार्ड किंवा आधार कार्ड यापैकी कोणतंही एक कागदपत्र ग्राहक केवायसीसाठी बँकेत जमा करू शकतात. यासोबतच तुम्हाला पासपोर्ट आकाराचा फोटो देखील बँकेत जमा करावा लागेल.

केवायसी संदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही आयडीबीआय बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर देखील माहिती मिळवू शकता. तसेच  1800-209-4324, 1800-22-1070 किंवा 022-67719100  या क्रमाकांवर संपर्क साधून देखील तुम्ही केवायसी संदर्भात माहिती मिळवू शकता.

महत्त्वाच्या बातम्या-

मुलाच्या चौक.शीनंतर किरीट सोमय्या आ.क्रमक, उद्धव ठाकरेंवि.रुद्ध उचलणार मोठं पाऊल!

सततच्या घस.रणीनंतर सोन्याच्या दरात क्षुल्लक वा.ढ तर चांदीच्या दरात मोठी घ.ट, वाचा आजचे दर…

कंगनाचं बरळनं चालूच! इतिहास चु.कीचा ठरवत नथुराम गोडसेंच्या समर्थनार्थ केलं ट्वीट, म्हणाली…

धक्कादायक! अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या भावाला भर चौकात घातल्या गो.ळ्या

भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याच्या मुलावर खं.डणीचा आ.रोप, पो.लिसांकडून क.सून चौ.कशी