“मुख्यमंत्री माझ्या पक्षात आले तर मला आनंदच होईल, मी टेबलावर उभा राहून…”

मुंबई | शिवसेना पक्षात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार (MVA) कोसळले. शिंदेंनी शिवसेनेचे 40 आमदार यशस्वीरित्या फोडले. त्यानंतर त्यांनी भाजपच्या पाठिंब्याने आपल्या गटातील आमदारांना घेऊन सरकार स्थापन केले.

शिवसेनेने या बंडखोरांवर कारवाई करत त्यांच्या गटातील 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई केली. त्या कारवाईला शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court of India) आव्हान केले होते. त्यावर येत्या 1 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.

शिंदे गटाला पक्षांतर विरोधी कायद्याच्या कचाट्यातून वाचायचे असल्यास त्यांना आपल्या गटातील आमदारांना घेऊन वेगळ्या पक्षात विलीनीकरण करणे गरजेचे आहे. त्यामुळे ते आता न्यायालय काय निकाल देणार? आणि शिंदे कोणत्या गटात जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

शिंदे यांनी जर माझ्या पक्षात येण्याचा निर्णय घेतला, तर मला आनंदच होईल आणि मी टेबलवर उभा राहून त्यांचे स्वागत करेन, असे रिपाईचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी म्हटले आहे.

तसेच त्यांनी राज्यात मंत्रीमंडळ विस्तार लवकरच होईल. आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अधिवेशन होऊ शकेल, असे भाकित आठवलेंनी व्यक्त केले.

रामदास आठवलेंनी शिंदे यांना आपल्या पक्षात येण्यावर काही अटी ठेवल्या आहेत. राज्याच्या नव्या मंत्रीमंडळात रिपाईला एक तरी मंत्रीपद हवे, अशी मागणी त्यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.

एकीकडे एकनाथ शिंदे हे आमचा गट हीच खरी शिवसेना असे म्हणत आहेत, तर दुसरीकडे शिवसेना त्यांच्यावर आरोप करत आहेत. त्यामुळे आता कायदा काय म्हणतो, या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

येणाऱ्या काळात जर न्यायलयाने शिंदे यांना पक्षांतर करण्याचा आदेश दिला, तर ते कोणत्या पक्षात जाणार? हे पहाणे आगामी काळात महत्वाटचे ठकणार आहे.

महत्वाच्या बातम्या – 

“बाळासाहेबांच्या पोटी आलात म्हणजे काही राजा झालात का?” 

‘उद्धव ठाकरे दोन वेळा घरातून पळून गेले होते’, नारायण राणेंचा गौप्यस्फोट

“काय ते प्रश्न.. काय ती उत्तरं.. काय तो घरगुती कार्यक्रम.. एकदम ओक्के”

“उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचं अस्तित्व भाजपमुळेच आहे”

“तुमच्यात कर्तृत्व नाहीये, तुम्ही मर्द नाहीत, शिवसेनेच्या बापाचा फोटो लावून भीक मागू नका”