“आज बाळासाहेब असते तर संजय राऊतांच्या थोबाडीत मारली असती”

नाशिक | त्रिपुराच्या घटनेनंतर आता महाराष्ट्रात देखील तणावाचं वातावरण दिसून येतंय. अमरावतीमध्ये भाजप आणि समविचारी संघटनांनी बंद पुकारला होता. त्यानंतर आंदोलनावेळी हिंसचार घडलेला पहायला मिळाला आहे.

अमरावतीच्या या घटनेनंतर राजकीय वर्तुळात देखील आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या घटनेवरून भाजपवर निशाणा साधला होता. त्यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला आहे.

रझा अकादमी नावाची संघटना वातावरण बिघडवत असल्याचा आरोप केला जातोय. मात्र आता अमरावती, नांदेड आणि मालेगावातील वणवा पेटल्याने संजय राऊत यांनी भाजपला जबाबदार धरलं आहे.

राज्यातील सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपचा हा सगळा खेळ सुरू असल्याची टीका संजय राऊत यांनी केली होती. त्यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत यांचं वक्तव्य ऐकून मला कीव येते. राजकारणासाठी तुम्ही किती लाचार आहात. प्रत्येक गोष्टीत त्यांना भाजपचाच हात दिसतो, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

आजा स्वर्गीय बाळासाहेब असते तर त्यांनी एक थोबाडीत मारली असती, असा घणाघात देखील चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप आम्हीच सुरू केला. आरोग्य विभागाचे पेपर आम्हीच फोडले, असा खोचक टीका देखील चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे.

शेतकऱ्यांना सरकार पैसे देत होतं, आम्हीच त्यांना रोखलं. सगळं आम्हीच करत आहोत, अरे काय चाललंय काय?, असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांवर इतका अन्याय कधीच झाला नव्हता. तुम्हाला जर जिथं तिथं भाजपचाच हात दिसत असेल तर तो तुम्ही कापून टाका, तुम्ही तिघं आहात ना, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं आहे.

फक्त 5 टक्के मुस्लीम लोक गडबड करतात बाकी 95 टक्के लोक प्रमाणिक आहेत. तुम्ही आधी अशा घटनांवर टीका करत होता, तशी आताही करा, असा उपदेश देखील त्यांनी यावेळी दिला.

मुस्लीम मतांची तुम्ही चिंता करू नका. गडबड करणाऱ्यांवर तुम्ही टीका सुद्धा करणार नाही का ?, असा सवाल देखील त्यांनी यावेळी शिवसेनेला विचारला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-  

…तर मी माझा पद्मश्री पुरस्कार परत करण्यास तयार – कंगना राणावत

अमरावतीत कलम 144 लागू; तीन दिवस इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय

अमरावती बंदचे हिंसक रुप: आंदोलकांकडून दुकानांची तोडफोड

  ’50 रुपयांनी पेट्रोल-डिझेलचे दर कमी करायचे असतील तर…’; संजय राऊत यांनी सूचवला पर्याय

  “शिवसेनेनं कधीही मुस्लिमांना विरोध केला नाही, ते आमच्या हिंदुत्वाच्या व्याख्येत”