‘हा गावरान स्वॅग हाय’! एसटी कर्मचाऱ्याच्या मुलाने मांडली रॅपमधून व्यथा; पाहा व्हिडीओ

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. धुळे आगारामध्ये शिपाई कौतिक सोनवणे यांचा मुलगा हर्षल सोनवणे याने  रॅप साँग गाऊन एसटी कामगारांचा विषय प्रखरतेने मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

संवेदनशील कर्मचारी आता घरी बसून आहेत.एसटीचा कर्मचारी असा का लाचार झाला?, असा सवाल हर्षलने उपस्थित केला आहे. त्यामुळे आता संयमाचा अंत पाहिल्याने राग हा वाढलेला असल्याचं त्यांने या रॅपमध्ये म्हणून दाखवलं आहे.

खूप झाला अन्याय आता न्याय झाला पाहिजे. एसटी कर्मचाऱ्यांनी खूप सेवा दिली आहे. आता तुम्ही टॅक्स दिला पाहिजे, असं हर्षल यामध्ये म्हणतो.

36 आत्महत्या झाल्या तरी डोळे यांनी मिटले आहेत. एसटी कर्मचारी मरून गेला तरी राज्य सरकार पोहोचलं नाही. . माऊलीच्या वारीत देखील लाल परीने कर्तव्य बजावलं होतं. कोरोनाच्या काळात देखील कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली होती, याची आठवण देखील हर्षलने करून दिली आहे.

कर्तव्य बजावलं तरी देखील का म्हणून आमच्यावर असा हा अन्याय होतो? असा सवाल देखील त्याने उपस्थित केलाय. तरी देखील चार महिने आम्ही बिन पगारी आहोत, असंही हर्षल म्हणतो.

हा आला तो आला आले सर्व राजकारणी, सर्वांच पक्षांची पाठिंबा दिला होता. मग समजंत नाय मग खुपतंय कुणाला, असंही तो यामध्ये म्हणतो. प्रवाशांच्या जीव आम्ही हातावर घेऊन चालतो. ही कष्टाची नोकरी आणि हा गावरान स्वॅग आहे, असंही रॅपमध्ये त्याने म्हटलं आहे.

लढा अस्तित्वाचा जंग हे हमारी जारी आहे. आमचा एकच नारा एकच मागणी आहे की एसटी महामंडळाचं विलगीकरण करा, असंही तो रॅपमध्ये म्हणाला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचं आणि एसटी महामंडळाचं भविष्य धोक्यात आहे  आज सांगतो मागणी करा नाहीतर घाण दिवस येतील, असंही रॅपमध्ये म्हटलं आहे.

आता हात हातात द्या आणि संघर्षाची तयारी करा, असं म्हणत त्याने एसटी कर्मचाऱ्यांचं मनोबल वाढवलं आहे. मागण्या मान्य करा आम्ही कामावर येऊ, असंही हर्षल रॅपमध्ये म्हणतो.

आम्ही निलंबणाला घाबरत नाही. आता हातात हात देऊन मन खंबीर करा, असा सल्ला देखील त्याने रॅपच्या माध्यमातून दिला आहे. हे रॅप साँग आता जबदस्त व्हायर होत असल्याने हर्षलचं कौतुक देखील करण्यात येत आहे.

पाहा व्हिडीओ-


महत्त्वाच्या बातम्या- 

“आज बाळासाहेब असते तर संजय राऊतांच्या थोबाडीत मारली असती”

…तर मी माझा पद्मश्री पुरस्कार परत करण्यास तयार – कंगना राणावत

अमरावतीत कलम 144 लागू; तीन दिवस इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय

अमरावती बंदचे हिंसक रुप: आंदोलकांकडून दुकानांची तोडफोड

  ’50 रुपयांनी पेट्रोल-डिझेलचे दर कमी करायचे असतील तर…’; संजय राऊत यांनी सूचवला पर्याय