अखेर राज्यपाल झाले तयार; राज्यपालांच्या भेटीनंतर बाळासाहेब थोरातांनी दिली गुडन्यूज

मुंबई | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर हे पद अद्याप रिक्त आहे. अशातच आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात रिक्त जागेवर निवडणूक होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन विधिमंडळात चालू आहे. अधिवेशनादरम्यान सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार वाद रंगल्याचं सध्या पहायला मिळत आहे.

ठाकरे सरकार आणि भाजपमध्ये संघर्ष आता शिगेला पोहचला असतानाच महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.

त्यावेळी राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या मुद्द्यावर चर्चा झाली. त्यावेळी विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीवर देखील चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली होती.

अशातच आता पुन्हा एकदा बाळासाहेब थोरात आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी राजभवनावरून जाऊन राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. त्यावेळी विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीवर गंभीर चर्चा झाली.

विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घ्यावीच लागणार आहे. त्यासाठी मी भेटायला गेलो होतो. राज्यपालांना या संदर्भात विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी सकारात्मक उत्तर दिल्याचं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, चर्चा सकारात्मक झाली आहे पुढील आठवड्यात निवडणूक होईल, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले. त्यामुळे आता अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

“आमचे मित्र फडणवीस नटसम्राट आहेत, त्या व्हिडिओचं डबिंग केलेलं असू शकतं”

“अजित पवार ऐकत नाहीत पण बडे साहब सब देख रहे है”; फडणवीसांकडून आरोपांची सरबत्ती

“…तर आम्हीही अनिल परबांना बांबू लावण्यास मागे पुढे पाहणार नाही”

“ईडी आणि ईडीचे अधिकारी भाजपची ATM मशीन”, राऊतांचा हल्लाबोल

“अजित पवार तुमच्या शब्दाला काडीची किंमत नाही, मोठेपणा दाखवायचा बंद करा”