युद्धात आणि प्रेमात सगळं माफ असतं! सैनिकाने केला तरुणीला गुडघ्यावर बसून प्रपोज; व्हिडीओ बघाच

मुंबई | युद्धात आणि प्रेमात सगळं काही माफ असतं असं म्हणतात. जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणून प्रेमाचा उल्लेख केला जातो. प्रेमवीरांच्या अनेक जिवंत कहाण्या आजही सांगितल्या जातात.

सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यात घनघोर युद्ध सुरू आहे. रशियाने युक्रेनवर आक्रमक पावलं उचलत अनेक शहरांवर ताबा मिळावला आहे. दोन्ही देशांचे सैनिक आपापल्या देशाच्या रक्षणासाठी झुंज देत आहेत.

काही दिवसांपूर्वी युक्रेनमधील नागरिक रशियन सैनिकाला मदत करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. मनाच्या हळव्या कोपऱ्यात या व्हिडीओने जागा निर्माण केली होती.

अशातच आता युक्रेनच्या रणभूमीवरचा आणखी एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. युद्धाच्या भूमीवर प्रेमाचं गुलाब फुलताना पहायला मिळालं आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक गाडी थांबलेली दिसत आहे. तर त्या गाडीला रशियन सैन्याचे चेकिंगसाठी थांबवलं. त्यावेळी एका रशियन सैनिकाने एका तरुणीला गुडघ्यावर बसून प्रपोज केला.

त्यावेळी त्याने फुलांचा गुच्छ देखील दिला आणि मिठी मारली. सैनिकाच्या प्रपोजचा तरूणीने स्विकार देखील केला. त्यावेळी आजूबाजूला उभा असलेल्या सैनिकांनी टाळ्या वाजवत दोघांच्या प्रेमाला कबुली दिला.

दरम्यान, युद्धाच्या रणभूमीत द्वेषाने भरलेल्या प्रतिनिधींना एकप्रकारने या जोडप्यांनी प्रेमाचा संदेश दिला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओला लोक प्रतिसाद देताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ-

महत्त्वाच्या बातम्या –

ठरलं तर! विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत थोरातांनी दिली गुडन्यूज, म्हणाले…

“आमचे मित्र फडणवीस नटसम्राट आहेत, त्या व्हिडिओचं डबिंग केलेलं असू शकतं”

“अजित पवार ऐकत नाहीत पण बडे साहब सब देख रहे है”; फडणवीसांकडून आरोपांची सरबत्ती

“…तर आम्हीही अनिल परबांना बांबू लावण्यास मागे पुढे पाहणार नाही”

“ईडी आणि ईडीचे अधिकारी भाजपची ATM मशीन”, राऊतांचा हल्लाबोल