“सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला तर…”; संजय राऊत यांचा भाजपला मोठा इशारा

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज वादळी पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि ईडीवर टीकास्त्र सोडलं आहे. त्यावेळी त्यांनी किरीट सोमय्या यांच्यावर घणाघात केला.

महाराष्ट्रातलं सरकार त्यांना पाडायचं आहे. सरेंडर व्हा अन्यथा, सरकार पाडू अशा धमक्या भाजप देत असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं आहे. बहुमत असताना भाजप कोणाच्या भरोशावर तारखा देत आहे?, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला तर याद राखा. हे सरकार पुर्ण 5 वर्ष टिकणार असं मी आधीही म्हटलं होतं, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

मी पळपुटा नाही, मी पळून जाणारा नाही. तुम्ही चुकीच्या माणसांशी पंगा घेतला आहे. मला त्रास देण्यासाठी माझ्या निकटवर्तीयांची चौकशी केली जात आहे.

माझ्या विरोधात खोट्या साक्ष लिहून देण्यास जबरदस्ती केली. पाहटे चार वाजता ईडीने घरातून लोक उचलले. त्यांना अनेक तास डांबून ठेवल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे.

ईडीच्या लोकांनी सकाळी माझ्या बँकेची स्टेटमेंट नेली. ईडीच्या लोकांनी माझ्या 50 गुंठे जमिनीची चौकशी केल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या – 

“तो जो कोण बोलतोय दलाल, ज्याला मराठीत भडवा म्हणतात”

‘शेती इकायची नसती वो, राखायची असती’; प्रविण तरडेंनी शेअर केला वडिलांसोबतचा व्हिडीओ

निवडणुकीआधी काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचा राजीनामा; तब्बल 46 वर्षांनंतर ‘हात’ सोडला

मुंबईत ईडीची मोठी कारवाई! कुख्यात गुंड दाऊदच्या संबंधितांवर छापेमारी

 ‘या’ कंपनीच्या शेअर्सने अवघ्या 10 महिन्यांत गुंतवणुकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे झाले 66 लाख