“हिंमत असेल तर मोदी सरकार बरखास्त करून…”

मुंबई | आगामी काळात देशात विविध राज्यात विधानसभेच्या तर महाराष्ट्रात महापालिकेच्या निवडणूका होणार आहेत. परिणामी सध्या सर्व पक्षांनी आपापल्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.

राज्यात सध्या विधानपरिषदेच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून 6 जागा निवडण्यात येणार आहेत. परिणामी भाजप आणि सत्ताधारी महाविकास आघाडी यांच्यात जोरदार जुगलबंदी रंगली आहे.

राज्याच्या महाविकास आघाडीवर भाजपकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार राज्याच्या हिताचं काम करत नसल्याची टीका केली आहे.

राज्य सरकार काम करत नाही. परिणामी या सरकारला सत्तेत रहाण्याचा कोणताही अधिकार नाही, अशी टीका भाजपकडून करण्यात आली आहे. म्हणून आता राज्यात वाद निर्माण झाला आहे.

काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करताना महाविकास आघाडी सरकार किती काम करत आहे हे जनतेला माहिती आहे, असं वक्तव्य केलं आहे.

हिंमत असेल तर मोदी सरकार बरखास्त करून दाखवा आणि बॅलेट पेपरवर निवडणूका घ्या, असं आव्हान नाना पटोले यांनी भाजपला दिलं आहे. नाना पटोले यांनी फडणवीस यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत आज विधान परिषदेच्या रिकाम्या झालेल्या जागेसाठी प्रज्ञा सातव यांचा अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी उपस्थित काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांना नाना पटोले यांनी संबोधित केलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रदेश भाजप कार्यकारिणीला संबोधित करताना या राज्याला एक मुख्यमंत्री आहे की अनेक मुख्यमंत्री हेच समजत नसल्याची टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केली होती.

महाविकास आघाडीवरील फडणवीस यांच्या या टीकेला राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मलिक आणि फडणवीस यांच्यात गेल्या काही दिवसांपासून मोठा वाद रंगल्याचं पाहायला मिळालं आहे.

दरम्यान, नाना पटोले यांनी मोदी सरकार बरखास्तीची मागणी करताना बॅलेटपेपरचा उल्लेख केल्यानं पुन्हा एकदा इव्हीएम मशीनवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

 भर आंदोलनात रामदास आठवलेंनी रचल्या कवितेच्या ओळी, म्हणाले…

‘कपडे काढले तरी निर्लज्जांवर परिणाम होत नाही; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

“…म्हणजे पुर्ण बारामती चुकली का?; भाजपचा असला म्हणून काय झालं”

भाजप की काॅंग्रेस! कोल्हापूरच्या आखाड्यात कोणाचा पैलवान जिंकणार?

 “गेंड्याच्या कातडीचं सरकार म्हणणं म्हणजे हा गेंड्याचाच अपमान”