‘मला कळत नाही लोकं दारू का पितात?’; मुख्यमंत्र्यांना पडला प्रश्न

पाटना | कोरोना काळात सर्वकाही बंद होतं. पहिल्या लाटेवेळी सर्व दुकाने, बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र काही काळानंतर दारूची दुकानं खुली करण्यास सशर्त परवानगी देण्यात आली होती.

कोरोना काळात बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात दारू विक्री वाढल्याचं पहायला मिळालं होतं. तर त्यावेळी अवैध दारू पिल्याने काहीजणांचा मृत्यू झाल्याचं देखील समोर आलं होतं.

अशातच आता पुन्हा अवैध दारू पिल्याने बिहारमध्ये 40 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता बिहारी जनतेमध्ये संतापाचं वातावरण आहे.

झालेल्या प्रकारामुळे सध्या बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीकेची झोड उठताना दिसत आहे. अशातच आता नितीश कुमार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ते पुन्हा चर्चेचा विषय बनले आहेत.

मागील काळात बिहारमध्ये दारूबंदीची घोषणा करण्यात आली होती. या बाबतचा आढावा घेण्यासाठी नितीश कुमार यांनी मंत्रिमंडळाची आढावा बैठक घेतली होती.

या बैठकीनंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांना दारू पिल्याने मृत्यू झालेल्या घटनेवर प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी लोक का दारू पितात माहित नाही, असं नितीश कुमार म्हणाले आहेत.

दारू प्यायल्यास लोकांचा मृत्यू ओढवू शकतो. तो एक वाईट प्रकार आहे. मला कळत नाही लोक दारू का पितात, असं नितिश कुमार म्हणाले आहेत.

नितीश कुमार यांनी यावेळी विरोधकांना देखील चोख प्रत्युत्तर दिलं. ते ही गोष्ट विसरले आहेत का की हा निर्णय सगळ्यांच्या संमतीनंतरच घेण्यात आला आहे?, असं नितीश कुमार म्हणाले आहेत.

सत्ताधारी किंवा विरोधी पक्ष असा कोणत्याही पक्षाने तेव्हा या निर्णयाला विरोध का केला नाही, असंही नितिश कुमार म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या 

‘शिवाज्ञा! ये रे माझ्या गड्या…’; व्यंगचित्रातून राज ठाकरेंची बाबासाहेब पुरंदरेंना अनोखी आदरांजली

भर आंदोलनात रामदास आठवलेंनी रचल्या कवितेच्या ओळी, म्हणाले…

‘कपडे काढले तरी निर्लज्जांवर परिणाम होत नाही; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

“…म्हणजे पुर्ण बारामती चुकली का?; भाजपचा असला म्हणून काय झालं”

भाजप की काॅंग्रेस! कोल्हापूरच्या आखाड्यात कोणाचा पैलवान जिंकणार?