धक्कादायक! ‘या’ ठिकाणी सापडला Omicron चा नवा व्हेरिएंट

मुंबई | कोरोनाची परिस्थिती बदलत असताना लोकांना कोरोना महामारी संपली असं वाटतंय. मात्र, अद्याप कोरोना पुर्णपणे संपलेला दिसत नाही.

कोरोना व्हायरस सतत स्वतःला बदलत राहतो. म्यूटेशनमुळे हा व्हायरस नवीन व्हेरिएंटमध्ये बदलू शकतो. अशातच आता ओमिक्राॅन (Omicron) बीए 3 व्हेरिएंटनं धुमाकूळ घातला आहे.

दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिल्यांदा बीए 3 हा प्रकार म्हणजेच ओमिक्राॅनचा चौथा व्हेरिएंट आढल्याचं जागतिक आरोग्य संघटनेकडून स्पष्ट करण्यात आलंय. परिणामी परत एकदा सर्वांना कोरोनाच्या चौथ्या लाटेची चिंता लागली आहे.

जर हा व्हेरिएंट वेगानं पसरला आणि लस किंवा नैसर्गिक प्रतिकारशक्तीला मागे टाकलं तर कोरोनाची प्रकरणे वाढू शकतात.

दरम्यान, नवीन लाट येण्याची शक्यता फारच कमी आहे, कारण लोकसंख्येचा मोठा भाग ओमिक्राॅन व्हेरिएंटनं संक्रमित झाला आहे, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

जर्नल ऑफ मेडिकल वायरोलाॅजीमध्ये प्रकाशित आरोग्य संघटनेच्या रिपोर्टमध्ये बीए 3 बाबात सविस्तर सांगण्यात आलं आहे. सध्यातरी याबाबत आणखीन ठोस असं काही सांगता येत नाही.

बीए 1, बीए 2 नंतर आता बीए 3 व्हेरियंटनं सर्वांना चिंतेत टाकलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत सर्वांना सुचित केलंय. परिणामी जगभरात लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे.

बीए 1 आणि बीए 2 प्रमाणंच या व्हेरियंटचे लक्षण असल्यानं काळजी घेणं गरजेचं आहे. सध्या फक्त दक्षिण आफ्रिकेमध्ये असा प्रकार आढळला आहे. सध्या कोरोनाच्या या व्हेरियंटचा प्रभाव जास्त नाही.

महत्त्वाच्या बातम्या – 

“अजित पवार ऐकत नाहीत पण बडे साहब सब देख रहे है”; फडणवीसांकडून आरोपांची सरबत्ती

“…तर आम्हीही अनिल परबांना बांबू लावण्यास मागे पुढे पाहणार नाही”

“ईडी आणि ईडीचे अधिकारी भाजपची ATM मशीन”, राऊतांचा हल्लाबोल

“अजित पवार तुमच्या शब्दाला काडीची किंमत नाही, मोठेपणा दाखवायचा बंद करा”

Women’s Day निमित्त महिला पोलिसांना मोठं गिफ्ट; आता ‘इतक्या’ तासांची असणार शिफ्ट