SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! ATM मधून पैसे काढण्यासाठी असणार ‘हा’ नवा नियम

मुंबई | नवीन आर्थिक वर्षात अनेक बॅंकांनी आपापल्या नियमांमध्ये बदल केले आहेत. सध्या वाढलेल्या ऑनलाईन बॅंकिंग व्यवहाराबाबत महत्त्वाती माहिती आता समोर येत आहे. (Important news for SBI customers)

सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य बँक भारतीय स्टेट बॅंकेनं आपल्या नियमांमध्ये बदल करणार असल्याचं सध्या समोर येत आहे. या निर्णयाचा परिणाम एसबीआयच्या करोडो ग्राहकांवर होणार आहे.

एसबीआयच्या करोडो ग्राहकांसाठी कामाची बातमी आहे. एसबीआयने एटीएममधून पैसे काढण्याचे नियम बदलले आहेत. एटीएम व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी एसबीआयने एक नवीन उपक्रम सुरू केला आहे.

नवीन नियमाअंतर्गत आता ग्राहकाला या बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी आधी ओटीपी टाकणे अनिवार्य आहे. बँकेच्या या नव्या नियमानुसार आता ग्राहकांना ओटीपी शिवाय पैसे काढता येणार नाहीत.

आता पैसे काढण्याच्या वेळी, ग्राहकांना त्यांच्या मोबाईल फोनवर एक ओटीपी मिळेल, तो टाकल्यानंतरच ते एटीएममधून पैसे काढू शकतील. 10 हजार रूपयांपेक्षा अधिक रक्कम काढायची झाल्यास ओटीपी अनिवार्य आहे.

बॅंकेनं हा नियम सुरक्षित व्यवहार व्हावा यासाठी लागू केला आहे. बॅंकेच्या या निर्णयानं ग्राहकांना बॅंकेच्या एटीएममधून पैसे काढताना सोबत मोबाईल पण ठेवावा लागणार आहे.

ग्राहकांना सध्या ऑनलाईन तंत्रज्ञानाचा अधिक फायदा देण्याचा बॅंकेचा मानस आहे. परिणामी डिजिटल स्वरूपातील व्यवहारात कसलीही अडचण भासणार नाही याची काळजी सध्या बॅंकेकडून घेण्यात येत आहे.

दरम्यान, सध्या एटीएममधून पैसे काढताना अनेक गैरव्यवहार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. परिणामी बॅंकेनं हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. अशा प्रकारचा निर्णय इतर बॅंकादेखील घेऊ शकतात.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “कोणताही गुन्हा नसताना माझ्या वडिलांना जेलमध्ये टाकलं होतं, त्यामुळे…”

चीन आणि युरोपमधून कोरोनासंदर्भात अत्यंत चिंताजनक बातमी समोर! 

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; रेल्वेने घेतला मोठा निर्णय 

‘ते नेते तपास यंत्रणांच्या टार्गेटवर’; संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ 

‘…म्हणून आमचा सातत्याने पराभव होतोय’; अखेर राहुल गांधींनी सांगितलं कारण