“रोहित शर्मा माझा कर्णधार नाही, विराटला कर्णधार करा”

नवी दिल्ली | भारतीय संघ सध्या श्रीलंकेविरूद्ध कसोटी मालिका खेळत आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारत दुसरा सामना जिंकण्याच्या स्थितीत आहे.

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली हा सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेटपटू आहे. सोशल मीडियावर विराट प्रचंड लोकप्रिय आहे. परिणामी विराट नेहमी चर्चेत असतो.

भारत-श्रीलंकेदरम्यान दिवस-रात्र कसोटी सामना चालू आहे. चाहत्यांनी बंगळुरूत होत असलेल्या या सामन्यात चक्क विराटला परत कर्णधार करण्याची मागणी केली आहे.

रोहित शर्मा हा माझा कर्णधार नाही तर विराट कोहली हा माझा कर्णधार आहे, असं चाहत्यांनी पोस्टरद्वारे म्हटलं आहे. परिणामी चाहत्याची चर्चा सर्वत्र होत आहे.

दोन चिमुकली मुलं हातात पोस्टर घेऊन चिन्नास्वामी स्टेडियममध्ये उपस्थित होते. त्यांच्या हातातील या पोस्टरला त्यांच्या वडीलांनी ट्विटरवर पोस्ट केलं आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली सध्या भारतीय संघाची विजयी घौडदौड कायम आहे. रोहित शर्मा कर्णधार झाल्यापासून भारतानं एकही सामना गमावला नाही.

सदरील पोस्टरवरून नेटकऱ्यांनी लहान मुलांच्या वडीलांना फटकारलं आहे. रोहित शर्मा भारतीय संघाचा कर्णधार आहे तुमच्या लहान मुलांचा नाही, अशी एका व्यक्तीनं कमेंट केली आहे.

दरम्यान, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं दमदार कामगिरी केली आहे. विराटच्या अचानकपणे दिलेल्या राजीनाम्यानंतर मोठा वाद उद्भवला होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

 …अन् भर सभागृहात धनंजय मुंडेंनी थोपटले दंड; पाहा व्हिडीओ

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; रेल्वेने घेतला मोठा निर्णय 

‘ते नेते तपास यंत्रणांच्या टार्गेटवर’; संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ 

‘…म्हणून आमचा सातत्याने पराभव होतोय’; अखेर राहुल गांधींनी सांगितलं कारण 

“शरद पवारांच्या हिंमतीने मुंबईला अंडरवर्ल्ड पासून वाचवलं”