नवी दिल्ली | कोरोना रूग्णसंख्येत सातत्यानं चढ-उतार पहायला मिळत आहेत. जागतिक स्तरावर कोरोनाच्या ओमिक्राॅन या नव्या व्हेरियंटनं मोठा धुमाकूळ घातला आहे. परिणामी सर्वांच्या चिंतेत भर पडली आहे. (WHO gave serious warning)
जागतिक आरोग्य संघटना सध्या सर्व प्रकारच्या कोरोना रूग्णांवर लक्ष ठेवून आहे. गेल्या दीड वर्षात कोरोनानं अनेकदा नवीन व्हेरियंटमुळे सर्वांचं टेन्शन वाढवलं असताना आता नवीन माहिती समोर येत आहे.
चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार परत एकदा सुरू झाला आहे. आशियातील देशांनी लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सुचना जागतिक आरोग्य संघटनेनं दिल्या आहेत.
आरोग्य संघटनेच्या टेक्निकल विभागाच्या प्रमुख मारिया वेन केरखोव यांनी कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
गेल्या आठवड्यात 11 मिलीयन पेक्षा अधिक केसेस नोंदवल्या गेल्या आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात रूग्णसंख्या आठ पटीनं वाढली आहे.
सध्या वाढत असलेली रूग्णसंख्या ही ओमिक्राॅनमुळं वाढत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. परिणामी सर्वत्र चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
ज्या भागात कोरोनाचे निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्या भागात कोरोना रूग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं देखील केरखोव म्हणाल्या आहेत.
दरम्यान, कोरोनाच्या चाचण्या वाढवण्यासोबतच लसीकरणाचा वेग वाढवण्यावर देशांनी भर देण्याची गरज केरखोव यांनी बोलून दाखवली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
31 मार्चच्या आधी ‘ही’ 5 कामं आटपून घ्या; नाहीतर मोठं नुकसान होईल
आर्चीचा फोटो पाहून परश्या दिवाना, अशी कमेंट केली की… झाले सगळेच सैराट
नोकरीची सुवर्णसंधी! ‘ही’ प्रसिद्ध IT कंपनी देणार तब्बल 60 हजार भारतीयांना नोकरी
Deltacron: डेल्टाक्राॅनमुळं टेन्शन वाढलं! जाणून घ्या किती धोकादायक आणि काय आहेत लक्षणं?
राज्यपालांचा ठाकरे सरकारला दणका! विशेषाधिकार वापरत रद्द केला ‘तो’ मोठा निर्णय