‘या’ महिन्यापर्यंत कोरोनाची तिसरी लाट संपणार; ICMR ने दिली महत्वाची माहिती

मुंबई | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने जगभरात धुमाकूळ घातला आहे. भारतासह सर्वच देशांना आतापर्यंत कोरोना विषाणूची पहिली आणि दुसरी लाट सहन करावी लागली आहे. यामुळे कोरोना कधी संपणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. याचं उत्तर आयसीएमआरने दिलं आहे.

भारतातील सक्रिय (COVID-19) संख्या आता 14.35 लाखांवर घसरली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या एका अधिकाऱ्याच्या मते, देशातील काही भागांमध्ये या महिन्याच्या अखेरीस तिसरी लाट ओसरण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र, दिल्ली आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये या महिन्याच्या अखेरीस नवीन रुग्णांची संख्या मूळ पातळीपर्यंत खाली येईल, असं ICMR चे अतिरिक्त महासंचालक डॉ. समीरन पांडा यांनी म्हटलंय.

मुंबई, पुणे, ठाणे आणि रायगड यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये संसर्गाची संख्या कमी होत चालली आहे, तरीही रुग्णांची संख्या दररोज सुमारे 48,000 (काही आठवड्यांपूर्वी) वरून सध्या 15 हजारांपर्यंत घसरली आहेत, असं त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी सांगितलं की, महामारीची तिसरी लाट मार्चच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात संपुष्टात येईल.

‘सरकार अतिरिक्त निर्बंध लादणार नाही. मात्र येत्या काही दिवसांत ते हळूहळू कमी करेल. दोन दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळाने तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या निर्बंधांवर चर्चा केली.

काही ठिकाणी निर्बंध शिथिल केले गेले आहेत आणि प्रकरणांची संख्या कमी झाल्यामुळे हळूहळू राज्यभरात आणखी शिथिल केली जाईल, असं राजेश टोपे म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

“तुमच्यासारख्या टॅलेंटेड नागरिक दिल्लीत बोलल्या तर…” 

काळजाचा ठोका चुकवायला लावणाऱ्या डॉ. सुवर्णा वाजेप्रकरणाचं गूढ उकललं! 

“राज्यात सत्ता आमचीच तरी नितेश राणेंसाठी सॉफ्ट कॉर्नर दाखवला” 

“राहुल गांधींनी तीर सोडला आणि सत्ताधारी घायाळ झाले” 

राज्यातील पोलिसांच्या बदल्यांसंदर्भात बड्या अधिकाऱ्याचा सर्वात धक्कादायक खुलासा!