मुंबई | मुंबईत 3 टक्के घटस्फोट हे ट्रॅफिकमुळे होत असल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केला आहे. यावर प्रतिक्रिया देत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी अमृता फडणवीस यांच्यावर खोचक टीका केली आहे.
अमृता फडणवीस यांचा तर्क हास्यास्पद आहे. त्या दरवेळी ऐकावं ते नवलंच अशाप्रकारचं बोलत असतात. आता तर त्यांनी जावईशोध लावला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर हसावं की रडावं असा प्रश्न मुंबईकरांना पडला असल्याची टीका किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी केली
अमृता ताईंसारखी सामान्य स्त्री हे ऐकायला जरा वेगळं वाटतंय. कारण सामान्य स्त्रिया आपण येता-जाता रस्त्यावर बघत असतो, असं त्यांनी म्हटलं आहे.
दरवेळी उठायचं आणि वेगवेगळं काहीतरी बोलायचं. आज तर त्यांनी फारच मोठा जावईशोध लावला आहे की 3 टक्के घटस्फोट वाहतुकीच्या कोंडीमुळे होत आहेत. म्हणजे यांच्यावर आता हसावं की रडावं असा प्रश्न पडला आहे. करमणुकीचे इतर कार्यक्रम बघण्यापेक्षा भाजपाच्या इतर सामान्य स्त्रियांपासून अगदी उच्चभ्रू आणि उच्चशिक्षित अशा सगळ्यांच्या कमेंट आपण ऐकतोय. हे सगळे जावईशोध हेच लावत आहेत, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्यात.
जे काही 105 घरी बसले आहेत, त्याचा त्यांच्या घरातल्या सामान्य स्त्रीला त्रास होतोय. त्या त्रासापोटी ही वक्तव्य होत आहेत. खूपच भ्रमिष्टासारखी वक्तव्य केली जात आहेत, असं पेडणेकर म्हणाल्यात.
जो उठतोय तो राजकारणात उडी मारतोय आणि आघाडी सरकारवर बोलतोय. महाराष्ट्र आणि मुंबईविषयी बोलण्यापेक्षा केंद्रात बोला आणि राज्याच्या वाट्याला काहीतरी चांगलं मिळवून द्या. तुम्ही इतक्या टॅलेंटेड नागरिक दिल्लीत बोलल्या, तर लवकर काहीतरी चांगलं महाराष्ट्राला मिळेल, असं देखील किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
अमृता फडणवीस यांना याबाबत विचारलं असता त्या म्हणाल्या की, तुम्हाला माहिती आहे की मी सर्व्हे एजन्सी तर नाही. एका सर्व्हे एजन्सीमधून मला हा डेटा मिळाला होता. सर्व्हे मंकी डॉट कॉम यांनी सॅम्पलिंग केलं होतं लोकांचं आणि घटस्फोटाबाबत हा डेटा दिला होता की 3 टक्के लोकं हे घटस्फोट घेतात. त्यात अनेक कारणं होती आणि त्यातील एक कारण होतं ट्रॅफिक जॅम. त्यांच्या घरगुती आयुष्यावर परिणाम होत होता. पाच तास, चार तास, तीन तास त्यांचा वेळ ट्रॅफिकमध्ये जात होता. त्यामुळे ते घरी वेळ देऊ शकत नव्हते आणि त्यामुळे घटस्फोट झाले, असा दावा त्यांनी केलाय.
महत्वाच्या बातम्या-
काळजाचा ठोका चुकवायला लावणाऱ्या डॉ. सुवर्णा वाजेप्रकरणाचं गूढ उकललं!
“राज्यात सत्ता आमचीच तरी नितेश राणेंसाठी सॉफ्ट कॉर्नर दाखवला”
“राहुल गांधींनी तीर सोडला आणि सत्ताधारी घायाळ झाले”
राज्यातील पोलिसांच्या बदल्यांसंदर्भात बड्या अधिकाऱ्याचा सर्वात धक्कादायक खुलासा!
मी फडणवीसांची बायको आहे हे तुम्ही विसरून जा- अमृता फडणवीस