पोलिसांसाठी महत्वाची बातमी; इतकी मोठी पगारकपात होणार

मुंबई | पोलिसांच्या प्राप्तिकराची रक्कम जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांच्या पगारातून कापावी, असे आदेश निघाले आहेत. पगारातून पुढील दोन महिने साधारणत: 35 ते 50 हजार रुपयांची कपात होईल.

गुंतवणुकीच्या नोंदी योग्य पद्धतीने केल्या नसल्याने असा प्रकार घडल्याचा आरोप होत आहे. इतकी मोठी पगारकपात होईल तर इतर खर्च कसं भागवावं, अशी व्यथा पोलिसांनी आपल्या वरिष्ठांकडे मांडली आहे.

पोलीस विभागातील कर्मचारी, अधिकाऱ्यांचे वेतन किती, त्यांची गुंतवणूक किती, त्यांचे किती उत्पन्न करपात्र ठरते, याची नोंद आणि त्याचे व्यवस्थापन पोलिसांनी ठरवलेली सीए कंपनी करत असते.

कुणाच्या नोंदी बरोबर झाल्या नाहीत. कुणाच्या काही चुका झाल्याची माहिती आहे. पोलीस आयुक्तालयातील अधीक्षक कार्यालयाने शुक्रवारी सगळी ठाणी व संबंधित विभागांना एक पत्र पाठवलं. ज्यांचा प्राप्तिकर 20 हजारांहून अधिक आहे, तो जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांच्याच पगारातून कापला जाईल, असं सांगितलं गेलं.

कुणाला दीड लाख, कुणाला एक लाख, कुणाला पन्नास हजार रुपये प्राप्तिकर दोनच महिन्यांत भरायचा आहे. ज्यांचे पगार जेमतेम आहेत, त्यांचं काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

की भरली आहे. यामुळे उपासमारीची वेळ येणार असल्याचे पत्र पोलीस महासंचालकांना लिहिण्यात आले. वेतनकपातीत सवलत देण्याची नम्र विनंती यात करण्यात आली.

पोलीस कर्मचाऱ्याने लिहिलेलं हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालंय. प्राप्तिकरचे काम नवीन कंपनीला देण्यात आले आहे. डिसेंबरमध्येच हे काम व्हायला हवं होतं. कंपनीनं ते केलं नाही. गृहकर्ज, विमा व इतर कपातीचे हप्ते कंपनीने जोडले नाहीत त्यामुळे 35 ते 50 हजारांपर्यंत वेतनकपात करण्यास सांगितलं आहे, असंही व्हायरल पत्रात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

Omicron च्या BA.2 स्ट्रेनमुळे शास्त्रज्ञ चिंतेत; दिला ‘हा’ गंभीर इशारा 

हैराण करणारी बातमी समोर; 5 दिवसांच्या बाळाचा कोरोनामुळे मृत्यू पण…. 

 “मोदींच्या हुकूमशाहीकडील वाटचालीला केवळ काॅंग्रेसच रोखू शकतं”

 LICची भन्नाट योजना! दर महिन्याला मिळणार 12 हजार रूपये

रोहित पवारांनी व्यक्त केली मंत्री होण्याची इच्छा, म्हणाले…