एकाचवेळी 20 महिलांना डेट करत होता व्यक्ती; असं फुटलं बिंग

नवी दिल्ली | एका व्हायरल व्हिडिओमुळे (Viral Video) अमेरिकेच्या न्यूयॉर्क येथील काही महिलांना समजलं की त्या सगळ्या एकाच व्यक्तीला डेट करत होत्या.

या संपूर्ण घटनेची सुरुवात झाली, टिकटॉकवर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओपासून. मागील मंगळवारी टिकटॉक यूजर मिमी शाओने एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यात तिने सांगितलं की ती कॅलेब नावाच्या एका व्यक्तीला डेट करत होती. मात्र, तो अचानक गायब झाला आणि तिच्यासोबतचा संपर्कही तोडला.

आपल्या व्हिडिओमध्ये मिमीने सांगितलं की अनेक महिला तिला विचारत आहे, की ती वेस्ट एल्म कॅलेब नावाच्या व्यक्तीचा उल्लेख करत आहे का.

मिमीला वाटलं की त्या दुसऱ्याच कॅलेबबद्दल बोलत आहेत. मात्र, एकसोबतच इतक्या महिला एकाच नावाच्या व्यक्तीबद्दल तपास करत असल्याचं जाणून तिच्या मनात उत्सुकता निर्माण झाली (Man). तेव्हा तिने व्हिडिओ बनवला आणि महिलांना सावध केलं की वेस्ट एल्म कॅलेब नावाच्या एका व्यक्तीपासून दूर राहा, तो धोका देत आहे.

या व्यक्तीला वेस्ट एल्म कॅलेब नाव यासाठी देण्यात आलं कारण तो एका फर्निचर कंपनीमध्ये काम करत होता, ज्याचं नाव असंच होतं.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर न्यूयॉर्कमधील तब्बल 20 महिलांना आपल्यासोबत झालेली फसवणूक समजली. त्यांना समजलं की त्या सगळ्या एकाच व्यक्तीला डेट करत होत्या.

या व्यक्तीने या सगळ्यांना डेट केलं आणि अचानकच गायब झाला. त्याने काहीही माहिती दिली नाही, की तो कुठे जात आहे.

महत्वाच्या बातम्या- 

Omicron च्या BA.2 स्ट्रेनमुळे शास्त्रज्ञ चिंतेत; दिला ‘हा’ गंभीर इशारा 

हैराण करणारी बातमी समोर; 5 दिवसांच्या बाळाचा कोरोनामुळे मृत्यू पण…. 

 “मोदींच्या हुकूमशाहीकडील वाटचालीला केवळ काॅंग्रेसच रोखू शकतं”

 LICची भन्नाट योजना! दर महिन्याला मिळणार 12 हजार रूपये

रोहित पवारांनी व्यक्त केली मंत्री होण्याची इच्छा, म्हणाले…