“काश्मीरसाठी आम्ही कोणत्याही थराला जाऊ”

इस्लामाबाद |  जी-7 शिखर संमेलनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल ट्रम्प यांची भेट झाली. या भेटीनंतर काश्मीरचा प्रश्न हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातला अंतगर्त प्रश्न असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे चांगलेच खवळले आहेत. भारतासारखीच पाकिस्तानकडेही अण्वस्त्र असल्याची धमकी इम्रान खान यांनी दिली आहे. काश्मीरसाठी आम्ही कोणत्याही थराला जाऊ, असं ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमधून कलम 370 हटवून ऐतिहासिक चूक केलीये, असंही इम्रान खान म्हटले. आता काश्मीरबाबत निर्णय घेण्याची वेळ आल्याचंही ते म्हणाले.

भारतासोबत जेव्हाही चर्चा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा दहशतवादाचा आरोप होत असतो, असं वक्तव्य इम्रान खान यांनी केलं. काश्मीरबाबत पाकिस्तान कोणत्याही मर्यादेपर्यंत जाऊ शकतो, असाही दम भरण्याचा प्रयत्नही इम्रान खान यांनी केला. 

जी-7 शिखर संमेलनाच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना काश्मीर मुद्द्यावरून स्पष्ट संदेश दिला. ‘आम्ही कोणत्याही देशाच्या अंतर्गत गोष्टींमध्ये लक्ष देत नाही, त्यामुळे आमच्या अंतगर्त गोष्टींमध्ये दुसऱ्या कोणीही दखल द्यायचे कष्ट घेऊ नयेत,’ असं मोदींनी ट्रम्प यांना सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-