लोकशाहीच्या चिंधड्या करताना सरकारला लाज कशी वाटत नाही- धनंजय मुंडे

मुंबई : विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात शिक्षकांनी शुक्रवारपासून आंदोलन पुकारलं आहे. आंदोलन करणाऱ्या शिक्षकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. यावर मुस्कटदाबी करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. भावी पिढी घडवणाऱ्यांशी तुच्छ वागणूक देऊन तुम्ही कोणता आदर्श ठेवत आहात. लोकशाहीच्या चिंधड्या करताना सरकारला लाज कशी वाटत नाही, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

धनंजय मुंडेनी या प्रकरणी ट्वीट करत सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. 

आंदोलक मुख्यमंत्र्याच्या निवास्थानाकडे निघाले असताना पोलिसांनी गेटवरच आंदोलकाना अडवलं आणि लाठीचार्ज केला आहे. आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप आंदोलन करणाऱ्या शिक्षकांनी केला आहे. 

दरम्यान, एकीकडे राज्यातील शाळा सुरू झाल्या आहेत. आणि दुसरीकडे शिक्षकांनी आंदोलन पुकारलं असल्याचं दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या-